Mr India 2: अनिल कपूरने ‘मिस्टर इंडिया 2’ बद्दलची पोस्ट हटवली अन् चर्चांना उधाण
Anil Kapoor Delete Insta Account: अनिल कपूर (Anil Kapoor) हा बॉलिवूडमधील एव्हरग्रीन अभिनेते अभिनेत्यांपैकी एक आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीतअनेक प्रकारच्या व्यक्तिरेखा साकारून त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केले आहे. (Mr India 2) या अभिनेत्याची फॅन फॉलोइंगही मोठी आहे. (Insta Post Delete) काल, अनिल कपूरने त्यांच्या इन्स्टाग्रामवरील सर्व पोस्ट डिलीट केल्या आहेत. त्यामुळे सध्या जोरदार चर्चेत आला आहे. अभिनेत्याची मुलगी सोनम कपूर आणि जावई आनंद आहुजा यांनीही यावर आश्चर्य व्यक्त केले. दरम्यान ‘मिस्टर इंडिया 2’ च्या घोषणेसाठी अभिनेत्याने ही पोस्ट केली असावी, असा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.
‘मिस्टर इंडिया (1987) मधील त्याच्या पात्राप्रमाणे तो सोशल मीडियावर ‘गायब’ झाला आहे. आता अनिल कपूरचा भाऊ बोनी कपूर यांनी यावर प्रतिक्रिया दिली. बोनी कपूर यांनी अनिल कपूरने त्याच्या सर्व इंस्टाग्राम पोस्ट डिलीट केल्याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली. म्हणाले की, अनिलची इन्स्टा पोस्ट डिलीट करणे ‘मिस्टर इंडिया 2’ शी कनेक्ट असल्याची माहिती एका सूत्राकडून मिळाली आहे. अद्याप इंस्टाग्राम प्रोफाईल पाहिलेले नाही, त्यामुळे जोपर्यंत सर्व काही ठीक होत नाही तोपर्यंत मिस्टर इंडिया 2 बद्दल काहीही भाष्य करायला आवडणार नाही. बोनी पुढे म्हणाले की, “मला पाहू द्या, मी स्वतः ते आजून पाहिले नाही.” पण त्याने मला सांगितले की त्याला मला काहीतरी दाखवायचे आहे. सर्व काही माहिती मिळेपर्यंत तो मिस्टर इंडिया 2 च्या घोषणेबद्दल बोलू शकत नाही.
‘मिस्टर इंडिया’ 1987 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट बोनी कपूर निर्मित आणि शेखर कपूर यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटात अनिल कपूरने अनाथाश्रम चालवणाऱ्या व्यक्तीची भूमिका साकारली होती. त्याला एक घड्याळ सापडते, आणि तो अदृश्य होऊ शकतो. या चित्रपटात दिवंगत श्रीदेवी यांचीही महत्त्वाची भूमिका होती. मोगॅम्बोचे पात्र अमरीश पुरी यांनी साकारले होते, तर सतीश कौशिक कॅलेंडरच्या भूमिकेत दिसले होते. ‘मिस्टर इंडिया’ची गाणीही खूप आवडली आणि हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.
Aamir Khan: आमिर खान मुंबईला रामराम ठोकणार? नेमकं प्रकरण काय?
अनिल कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता लवकरच रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘अॅनिमल’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप वंगा रेड्डी यांनी केले आहे. नुकताच ‘Animal’ चा टीझर रिलीज झाला, यामध्ये अनिल, रणबीर कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसत होता. हा चित्रपट 1 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याशिवाय अनिल कपूर सिद्धार्थ आनंदच्या हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘फाइटर’ या चित्रपटातही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढीलवर्षी प्रदर्शित होणार आहे.