Download App

… म्हणून मी सध्या चित्रपटांपासून दूर; अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली खंत

Ashok Saraf : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उत्तम कॉमेडी टायमिंगचे असंख्य चाहते आहेत. या अभिनय सम्राटाला कॉमेडी करताना पाहणं एक अविस्मरणीय अनुभव असतो. गेले काही वर्षे अशोक सराफ हे फार ठराविक चित्रपटांमध्ये काम करतायत.शिवाय चित्रपटांमध्ये त्यांच्या वाट्याला त्यांच्या स्टाईलची कॉमेडी येत नसल्याची खंत त्यांनी नुकतची व्यक्त केली आहे. ( Actor Ashok Saraf expose reason behind stay away from Acting in Movie)

Gadar 2 Scene : सनी देओलच्या ‘त्या’ सीनमुळे चाहते चिंतेत; कोणत्या पात्राचा होणार मृत्यू? पाहा

बाईपण भारी देवा या केदार शिंदे दिग्दर्शित चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याला अशोक सराफ यांनी हजेरी लावली होती. त्यांच्या हस्ते हा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. यावेळी त्यांना आगामी चित्रपटांविषयी विचारलं असता सध्या चित्रपट करत नसल्याचं सांगत त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

Letsupp Special : लोकसभेच्या ‘त्या’ २१ जागा… ज्यांच्यासाठी काँग्रेस ‘मविआ’मध्ये भिडणार!

यावेळी अशोक सराफ म्हणतात की, ‘मी सध्या चित्रपट करत नाहीय. मला कुणी काही लिहूनच देत नाहीय. माझ्यासाठी लिहीणारे लेखकच नाहीत कुणी. मला कॉमेडीयन म्हणून लोकं ओळखतात. मी बाकी भूमिका पण करु शकतो हे बहुतेक लोकांना माहित नसावं किंवा त्याबद्दल त्यांची खात्री नाही. कुणीही मला त्याबद्दल विचारत नाही कॉमेडियन म्हणूनच विचार करतात. पण माझ्या स्टाईलची आणि वयाची कॉमेडी लिहीणारं आहे कोण ? ही मोठी खंत आहे की कुणी लिहीणारं नाहीय. कॉमेडी होत का नाही ? कॉमेडी का करत नाहीय ? की कुणी लिहीतच नाही आणि जे लिहीतात त्यांना कॉमेडी म्हणायची का ? म्हणजे आपण स्वत:ला फसवण्यासारखं आहे.’

यावर अशोक सराफ पुढे म्हणतात की,’माझ्याकडे स्क्रिप्ट येतात, मी त्या वाचतो आणि बाजूला ठेवतो. कारण ते मला करावसं वाटत नाही. मला जर त्यात काही करावसं वाटेल तर मी ते करणार. जोपर्यंत मला ठरवता येत नाही. स्क्रिप्टमध्ये तिकडे मी काम करत नाही कधी. त्यामुळे मी सध्या स्वस्थ आहे. कुणीतरी चांगली स्क्रिप्ट आणून दिली तर मी करेन. पण त्यांनी जर नुसती कॉमेडी द्यायचं ठरवलं तर मला शक्य होणार नाही. कारण माझ्या वयाची कॉमेडी लिहीणं शक्य नाहीय सध्या. कारण माझ्या वयाला कॉमेडी होऊ शकत नाही असा बहुतेक त्यांचा समज असावा. कारण मला आता रोल कुठले मिळणार? तर मला हिरोचे रोल नाही मिळणार, मला हिरोच्या मित्राचा रोल नाही मिळणार, मला आणखी कुणाचे रोल नाही मिळणार. मला मिळणार ते बापाचे रोल आणि कुठला बाप कॉमेडी असतो.एक काळ होता. तेव्हा बाप कॉमेडी दाखवायचे. तर मुळात असं आहे की लिहीणारे कुणी नाहीत. त्यामुळे काही होऊ शकत नाही. माझ्याबाबतीत सध्या हे होत असल्याने म्हणून मी काही सध्या करत नाही.’

शिवाय सध्या नाटकातच मन रमत असल्याचं अशोक सराफ यावेळी म्हटले. ते म्हणतात की, ‘त्यापेक्षा मी नाटक केलेलं मला आवडतं. स्टेज ही गोष्ट तुम्हाला फार काही देऊन जाते. सिनेमामध्ये तुम्ही एकदा कॅमेरामध्ये बंद झालात की बंद झालात.’

सध्या अशोक सराफ ‘व्हॅक्यूम क्लिनर’ या नाटकाच्या माध्यमातून नाट्यरसिकांचं मनोरंजन करत आहेत. 2022 मध्ये आलेल्या ‘वेड’ या चित्रपटातही त्यांनी अभिनेता रितेश देशमुखच्या वडिलांची भूमिका साकारली होती. नाटक, चित्रपट, मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अशोक सराफ आगामी काळात कोणत्या चित्रपटात झळकतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Tags

follow us