Gadar 2 Scene : सनी देओलच्या ‘त्या’ सीनमुळे चाहते चिंतेत; कोणत्या पात्राचा होणार मृत्यू? पाहा…

Gadar 2 Scene : सनी देओलच्या ‘त्या’ सीनमुळे चाहते चिंतेत; कोणत्या पात्राचा होणार मृत्यू? पाहा…

Gadar 2 Scene : दोन दशकांपूर्वी प्रदर्शित झालेला (Gadar ) ‘गदर: एक प्रेम कथा’ (Gadar 2 Teaser) हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट झाला होता. सिनेमाचा सिक्वेल असणारा ‘द कथा कंटिन्यूज:गदर 2’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सिनेमा मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सनी देवल (Sunny Deols) आणि अभिनेत्री अमिषा पटेल (Amisha Patel) यांची जोडी पुन्हा एकदा मोठा पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान या चित्रपटाचा टीझर निर्मात्यांकडून रिलीज करण्यात आला आहे. मात्र यामध्ये अभिनेता सनी देओलचा एक सीन समोर आल्याने चाहत्यांची चिंता वाढली आहे. (Which Character will die in Gadar 2 Sunny Deols that Scene revile )

या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे की, तारा म्हणजे सनी देओल हा पाकिस्तानात जातो. तेथे संघर्ष सुरू असतानाचे काही सीन या टीजरमध्ये दाखवण्यात आले आहेत. तर एका सीनमध्ये सनी देओल जमिनीवर बसून ढसाढसा रडत आहे. त्याच्या समोर दोन प्रेतं ठेवलेले आहेत. त्यामुळे सनी देओल रडतोय त्याच्या समोर असलेले दोन प्रेतं कुणाची यावरून प्रेक्षकांनी चित्रपटाच्या कथेचा अंदाज लावला आहे.

‘शिंदे सेनेला मिळाली दिल्लीश्वरांची प्यार की झप्पी’; नव्या जाहिरातीवर राष्ट्रवादीचा खोचक टोला

यावरून चाहते म्हणत आहेत कोणतं तरी महत्त्वाच्या पात्राचा मृत्यू झाला आहे. अनेकांनी थेट ताराची प्रेयसी सकिना म्हणजे अभिनेत्री अमिषा पटेलचाच मृत्यू दाखवला जाणार आहे. त्यानंतर तारा स्वतःला हरवून बसेस तर तो पाकिस्तानात जाऊन आपला मुलगा आणि इतर भारतीयांना परत घेऊन येईल. मात्र लोकांचे हे अंदाच कीतपत खरे् ठरतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सिनेमाचा टीझर रिलीज झाला असला तरी कोणत्याही सोशल मीडिया (Social media) प्लॅटफॉर्म वरती अपलोड करण्यात आलेला नाही. प्रेक्षकांना या सिनेमाचा टीझर पाहायचा असेल तर त्यांना चित्रपटगृहात जाऊनच बघावा लागणारच आहे. ‘गदर: एक प्रेम कथा’ हा सिनेमा पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आहे.
Sanjay Raut : “राजकारणाचं वारं कानात गेलं की दुखतं”

त्यामुळे या सिनेमाचे चाहते ‘गदर: एक प्रेम कथा’ हा सिनेमा चित्रपटगृहात पाहतील त्यांना ‘गदर २’ चा टीझर पाहिला मिळेल.‘गदर २’ हा सिनेमा मागच्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या गदर टू या सिनेमाबद्दलच्या अपडेट्स, दरम्यान चे फोटोज आणि व्हिडिओज सातत्याने व्हायरल होत होते. त्यामुळे प्रेक्षकांची टीझर पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube