दाक्षिणात्य ‘सैंधव’ सिनेमात Nawazuddin साकारणार खलनायकाची भूमिका; दमदार टीझर प्रदर्शित
Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीन सिद्दीकी हा बॉलिवूडमधील (Bollywood) अनेक दिग्गज कलाकारांपैकी एक आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. देशात आणि जगात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवल्यानंतर नवाजुद्दीन आता दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीत (Entertainment) पाऊल ठेवल्याचे बघायला मिळत आहे. (Social media) नवाजुद्दीन सिद्दीकी बऱ्याच दिवसांपासून एक सुपरहिट चित्रपट देण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच तो आता पुन्हा एकदा खलनायक म्हणून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
खरं तर यावेळी तो बॉलीवूडमध्ये नव्हे तर दाक्षिणात्य सिनेमात खलनायक म्हणून चाहत्यांना बघायला मिळणार आहे. नवाजुद्दीनच्या या आगामी सिनेमाचे नाव ‘सैंधव’ (Saindhava) असे आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून चाहत्यांचा देखील त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात दग्गुबती व्यंकटेश हा मुख्य भूमिकेमध्ये बघायला मिळणार आहे तर नवाजुद्दीन सिद्दीकी खलनायकाच्या भूमिकेमध्ये चाहत्यांना दिसणार आहे. नवाजची तीच जुनी खलनायकी स्टाईल देखील टीझरमध्ये बघायला मिळत आहे.
नवाजुद्दीनसोबत व्यंकटेश देखील जबरदस्त अॅक्शन करत असल्याचे बघायला मिळत आहे. सिनेमाचे दोन वेगवेगळे पैलू टीझरमध्ये दाखवण्यात आले आहेत. फॅमिली ड्रामापासून सुरू झालेली रंजक अशी कहाणी दहशतवादासारख्या गंभीर मुद्द्यावर येऊन कशा पद्धतीने थांबत असल्याचे टीझरमध्ये बघायला मिळत आहे. हा एक पॅन इंडिया सिनेमा असून चाहते देखील याची मोठ्या आतुरतेने वाट बघत असल्याचे दिसत आहे.
Kangana Ranaut: ‘इमर्जन्सी’ विषयी कंगनाची मोठी घोषणा; ट्वीट करत म्हणाली, ‘मी या चित्रपटासाठी…’
या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि व्यंकटेश यांच्यासोबत आर्या, श्रद्धा श्रीनाथ, रुहानी शर्मा, आंद्रिया जेरेमिया, सारा, जयप्रकाश हे कलाकार मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. पुढील वर्षी म्हणजे १३ जानेवारी २०२४ दिवशी हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे. सैंधवचे दिग्दर्शनाची धुरा शैलेश कोलानू यांनी सांभाळली आहे. हा सिनेमा तमिळ, तेलुगू, मल्याळम व हिंदी अशा चार भाषांमध्ये बघायला मिळणार आहे.