Shashank Ketkar: “ज्या वाड्यात माझा जन्म झाला…” शशांक केतकरची ‘ही’ पोस्ट चर्चेत

Shashank Ketkar: “ज्या वाड्यात माझा जन्म झाला…” शशांक केतकरची ‘ही’ पोस्ट चर्चेत

Shashank Ketkar: अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) हा मराठीतील लोकप्रिय कलाकार आहे. आजवर विविध मालिका, नाटक, चित्रपटांमधून त्याने काम केले आहे. सोशल मिडीयावरही (Social media) तो सक्रिय असतो. विशेषकरून त्याच्या सोशल मिडीयावरील पोस्ट (Post) लक्षवेधी असतात. शशांकने नुकतीच केलेली पोस्ट सध्या आता जोरदार चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्याने लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)


साताऱ्यातील त्याच्या नेने वाड्याचे फोटो (Photo viral) त्याने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. या फोटोत शशांकचा परिवार, पत्नि प्रियांका आणि स्वत: शशांकही पाहायला मिळत आहे. शशांकने या पोस्टमध्ये लिहीले आहे की, “सातारा. ज्या वाड्यात माझा जन्म झाला, तो हा नेने वाडा. खूप आठवणी आहेत या वाड्यातल्या. गेल्या काही महिन्यात आता हा पाडला जाईल आणि तिथे एका घरा ऐवजी, अनेक घरांची सात आठ मजली ईमारत उभी राहील.

आता हा वाडा फक्त काही फोटोस आणि आठवणीतच शिल्लक राहिल…” तेव्हा या वाड्याच्या आठवणी म्हणून शशांक आणि त्याच्या कुटुंबाने वाड्यासोबत खास फोटोशूट करत आठवणींना उजाळा दिलाय. काही गोष्टी या आपल्या आठवणींचा साठा असतात. हा वाडा शशांकसाठी लहानपणीची महत्त्वाची आठवण आहे. त्यामुळे या वाड्यासोबत त्याची भावनीक नाळ जोडली गेलीय आहे.

Prashant Damle: यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल नाट्यरसिक आणि कलावंतांसाठी होणार खुले

त्यामुळे हा वाडा त्याने फोटो आणि आठवणीत साठवून घेतला आहे. शशांक केतकर हा मालिकांमधून लोकप्रिय ठरला. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून श्री या भूमिकेतून त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतही अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून त्याने विविध भूमिका साकारल्या आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube