म्हणून… आई माझी बेस्ट फ्रेंड! स्वप्नीलने आईच्या 74 व्या वाढदिवशी लिहिली खास पोस्ट
Swapnil Joshis Special post on his mother’s 74th birthday : अभिनेता स्वप्नील जोशीची (Swapnil Joshi) आई तिचा 74 वाढदिवस साजरा करत आहे. तर सुपरस्टार, निर्माता, अभिनेता स्वप्नील जोशी 2024 हे वर्ष गाजवत आहे. स्वप्नील कायम वैविध्यपूर्ण गोष्टींसाठी चर्चेत असतो. आज याचं कारण देखील तितकंच खास (Entertainment News) आहे. स्वप्नीलने आईच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक छान व्हिडिओ शेयर करून आईला शुभेच्छा तर दिल्या आहेत, पण स्वप्नीलने त्याचं आणि आईच खास नातं यातून उलगडलं आहे.
View this post on Instagram
अभिनेता निर्माता स्वप्नील जोशीने आईच्या वाढदिवसानिमित्ताने एक खास व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो आईविषयी बोलताना दिसतोय स्वप्नील म्हणतो, “आम्ही मम्माज बॉय (Swapnil Joshis Mothers Birthday) आहे. आई ही माझी बेस्ट फ्रेंड आहे. मला एखादी मुलगी आवडली तर मी तिला हक्काने जाऊन सांगायचो. आई बसना आज काय झालं माहितीये…आई एकदम बंटा है होती. अजूनही ती बंटा है आहे. आई हे असं एकमेव नातं आहे, जे फोनवरच्या हॅलोने पण सांगतं काय रे, काय झालं?
पुढे स्वप्नीलने या व्हिडिओला तितकंच साजेसं छान कॅप्शन लिहिलंय “आई 74व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…तुझ्या शहाणपणाने, काळजीने आणि प्रेमाने या प्रवासाला आकार दिला. माझं आयुष्य म्हणण्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. मला या जगात आणल्याबद्दल आणि आमचे सर्व जीवन आनंदमय केल्याबद्दल धन्यवाद. तुझा दिवस उत्तम आरोग्य, अमर्याद आनंदाने आणि तू उदारपणे इतरांसोबत वाटून घेतलेले प्रेम आणि कुटुंबासाठी एक सुंदर घर बनवलेलं जावो, हे असे अनेक सुंदर क्षण एकत्र आहेत. तुझ्या अतुलनीय प्रवासासाठी शुभेच्छा खूप सारं प्रेम.
‘नथुराम गोडसे को मरना होगा’ हिंदी नाटकाचे विशेष प्रयोग; पुण्याच्या नेहरू मेमोरियल सभागृहात रंगणार
स्वप्नील सध्या कामात व्यस्त असला, तरी तो कायम त्याच्या फॅमिलीसोबत बघायला मिळतो. स्वप्नीलने तयार केलेला आईचा खास व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओ मधून या दोघांचं खास नातं देखील प्रेक्षकांना बघायला मिळतंय. स्वप्नीलने वर्ष अखेरीस त्याची स्वप्नपू्र्ती केलीय. रेंजरोव्हर कार खरेदी केली आहे. त्याने कुटुंबासोबत गाडीचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.