Vijay Raghavendra wife: साऊथच्या सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या पत्नीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन!

Vijay Raghavendra wife heart attack: साऊथ सिनेमाचा सुप्रसिद्ध अभिनेता विजय राघवेंद्र याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेता विजय राघवेंद्र (Vijay Raghavendra) याची पत्नी स्पंदना राघवेंद्र (Spandana Raghavendra) हिचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. बँकॉक येथील रुग्णालयात स्पंदनाने अखेरचा श्वास घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार विजय राघवेंद्र याची पत्नी संपूर्ण कुटुंबासह थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असलायची माहिती समोर आली आहे. परंतु या दरम्यान तिच्यावर काळाने घाला घातला आहे.
ಕನ್ನಡದ ಹೆಸರಾಂತ ನಟ ವಿಜಯ ರಾಘವೇಂದ್ರ ಅವರ ಪತ್ನಿ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ನಾಯಕರಾದ ಬಿಕೆ ಹರಿಪ್ರಸಾದ್ ಅವರ ಸಹೋದರ ಶಿವರಾಂ ಅವರ ಮಗಳು ಸ್ಪಂದನ ಅವರು ಬ್ಯಾಂಕಾಕ್ ನಲ್ಲಿ ಹೃದಯಾಘಾತದಿಂದ ಮರಣವನಪ್ಪಿದ್ದು ಸಂತಾಪಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸುತ್ತೇನೆ#spandana #vijayraghavendra pic.twitter.com/hzrwi5XGKj
— Dr Syed Naseer Hussain,MP Rajya Sabha (@NasirHussainINC) August 7, 2023
अभिनेता विजय राघवेंद्र याची पत्नी स्पंदना राघवेंद्र ही ४१ वर्षांची होती. तिला हृदयविकाराचा झटका कसा आला, याची माहिती अद्याप स्पष्ट झाली नाही. परंतु तिचा रक्तदाब सतत कमी होत होता. यामुळे तिला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे. विजय राघवेंद्र यांच्या पत्नीचे म्हणजेच स्पंदनाचे पार्थिव ८ ऑगस्ट रोजी बँकॉकवरून बेंगळुरूला आणले जाण्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे.
Nitin Desaiच्या’ आत्महत्येवर कौशल इनामदार यांची प्रतिक्रिया, पोस्ट शेअर करत म्हणाले; “माझं नातं…”
कन्नड स्टार अभिनेता विजय राघवेंद्र आणि स्पंदना राघवेंद्र यांनी २००७ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. विजय आणि स्पंदना या जोडीला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. विजय प्रमाणेच स्पंदना देखील मनोरंजन विश्वामध्ये झळकल्याचे पाहायला मिळाले आहे. २०१६ मध्ये आलेल्या ‘अपूर्व’ या सिनेमात स्पंदना राघवेंद्र हिने स्पेशल अपिअरन्स दिला होता. पत्नी स्पंदना परदेशात असली, तरी अभिनेता विजय राघवेंद्र सध्या बंगळुरूमध्ये आहे. ‘कड्डा’ या आगामी सिनेमाच्या प्रमोशनसाठी तो भारतात परतला होता. परंतु आता त्याच्या पत्नीच्या निधनामुळे या सिनेमाचे प्रमोशन देखील थांबवण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा हा सिनेमा २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता.
अभिनेता विजय राघवेंद्र हा कन्नड स्टार डॉ. राजकुमार यांचा पुतण्या आणि निर्माता एस.ए. चिन्नी गोडा यांचा मुलगा आहे. विजय राघवेंद्र याने १९८२ मध्ये बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले होते. तर, २००२मध्ये त्याने मुख्य अभिनेता म्हणून आपली कारकीर्द सुरू केली होती. त्याने आतापर्यंत अनेक सुपरहिट आणि हटके सिनेमा दिले आहेत.