Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णी दरवर्षी ‘या’ व्यक्तीच्या घरी खाते पहिली आमरस-पुरी, व्हिडीओ व्हायरल

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 15T110646.123

Actress Sonalee Kulkarni : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अप्सरा सोनाली कुलकर्णी (Actress Sonalee Kulkarni ) आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक फुलवा खामकर (Phulawa Khamkar) या दोघीही एकमेकींच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. या दोघीही सतत कोणत्याही गोष्टीवरून कायम चर्चेत असतात. नुकतंच सोनालीने फुलवासोबत मिळून आमरस पुरीचा (amras puri ) बेत केल्याचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल (video viral ) होत आहे. यापाठीमागचे विशेष कारण असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)


सोनाली कुलकर्णीने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला तिने “प्रथेप्रमाणे… आमरसपुरी” असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओमध्ये स्वतः अप्सरा आणि फुलवा या आमरस करत असल्याचे दिसत आहे. तेव्हा फुलवा म्हणते, “आमच्याकडे दरवर्षी अशी प्रथा आहे की सोनाली ही माझ्या घरी पहिला आंबा… आंबा नाही तर पहिली आमरस पुरी हे माझ्याकडे खात असते.

यानंतर अप्सरा म्हणजे सोनाली कुलकर्णीने सांगितले आहे की, “मी पहिल्यांदा आमरस बनवायला मदत करत आहे.” “कारण इतर वेळी ती फक्त आमरस खायला येते, पण आता तिला मी आमरस बनवण्यात मदत करत आहे. यावेळी मी आंबेही घेऊन आले आणि त्याच्या बदल्यात मी तिला आमरस पुरी देणार आहे”, असे यावेळी फुलवाने सांगितले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)


फुलवाने ते आंबे फ्रीजमध्ये ठेवले होते. कारण फ्रीजमध्ये आंबे ठेवले तर त्याची चव जाते. त्यामुळे यातील काही आंब्यांची चव गेली असल्याचे देखील तिने सांगितले आहे. तसेच फुलवा ताईने आणलेली आंबे आणि मी घेऊन आलेली आंबे अशा दोन्हींचा आंब्यांचा रस एकत्र करणार आहोत. त्यामुळे चव कळणार नाही, असे अप्सराने यावेळी म्हटले आहे.

Ved Movie On OOT : वेडच्या चाहत्यांना आनंदाची बातमी, वेड चित्रपट पाहा ‘या’ ओटीटीवर

दरम्यान सोनाली आणि फुलवाच्या या व्हिडीओवर अप्सराचा भाऊ अतुलने कमेंट केली आहे. “थोडासा पॅक करुनही घेऊन ये”, अशी कमेंट त्याने केली आहे. यावर फुलवाने “तू कधीही घरी येऊ शकतो, हे तुला माहिती”, असे उत्तर तिने त्याच्या कॉमेन्टवर दिले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube