‘होम मिनिस्टर’च्या १३ दिवसांसाठी सुरू झालेल्या प्रवासाला २० वर्ष पूर्ण; वाचा काय आहे पूर्ण कहाणी
Home Minister Show completes 20 years : दार उघड बये दार उघड हा आवाज ऐकू आला की समस्त महिला वर्ग टीव्ही सुरूकरुन बसतो. गेली १९ वर्षे हे चक्र अविरत सुरूआहे. मालिकेला इतकी वर्षे होऊन देखील अजूनही प्रेक्षकांचा तितकाच प्रतिसाद मिळतो. याच मालिकेमुळे महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर घराघरात पोहचले. (Home Minister) गेली २० वर्षे आदेश बांदेकर या मालिकेतून स्त्रियांचा सन्मान करत आहेत. पण हा प्रवास सुरू कसा झाला याबद्दल भाऊजींनी नुकतेच मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. यावेळी त्यांनी त्यांच्या पहिल्या भागाच्या शूटिंगची आठवणही काढली.
Deepika Padukone: गणेशोत्सवात रणवीरच्या कुटुंबात गौराईचं आगमन; दीपिका अन् रणवीर झाले आई-बाबा
ते म्हणाले, ‘झी मराठी वाहिनीवर एक मालिका बंद झाली होती आणि दुसरी मालिका सुरूहोणार होती. यादरम्यानच्या वेळात दोन आठवड्यांसाठी काहीतरी करावं अशा भावनेतून कार्यक्रम सुरूझाला. याच काळात मी स्ट्रगल करत होतो. मी दोन कॅमेरे घेऊन निघालो. लालबागमधील हाजी कासम बिल्डींग याच बिल्डींगमध्ये प्रोमो शूट करायचं असं आमचं ठरलं. तिथे गेल्यानंतर गाण्याची पहिली ओळ दार उघड वहिनी, दार उघड अशी आहे. पण जेव्हा मी त्या बिल्डींगमध्ये गेलो, तेव्हा पटापट त्या वहिनी दरवाजे बंद करु लागल्या. त्या सर्वसामान्य स्त्रिया होत्या. त्यांना एक प्रश्न विचारल्यावर त्या पळू लागल्या.
पहिला एपिसोड २२ मिनिटांसाठी शूट करायचा होता. तो एपिसोड आम्ही शूट केला. तो भाग आम्ही निखिल साने, नितीन वैद्य, अजय बाळवणकर यांना दाखवला. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर काहीही हावभाव नव्हते. त्यावेळी नितीन वैद्य यांनी त्या ऑफिसमध्ये काम करणारे, हाऊसकिपिंगची मंडळी वगैरे अशा लोकांना बोलवलं. त्याच्यासमोर तो भाग परत लावला. तो एपिसोड पाहिल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आलं आणि ठरलं की या कार्यक्रमाला कोणत्याही तांत्रिक गोष्टी लागू करायच्या नाहीत. ती गृहिणी रिटेक घेणार नाही, अशा पद्धतीने याचे चित्रीकरण केलं जाईल.
येस, मलाही राजकारणात यायला आवडेल; विधानसभेपूर्वी मानसीचे राजकारणात येण्याचे संकेत
फक्त १३ दिवसांसाठी एक मालिका बंद होणार होती, म्हणून हा कॅमेरा घेऊन बाहेर पडलो. आता १४ लाखाहून जास्त किलोमीटरचा प्रवास करुन ही आनंदाची यात्रा १९ वर्ष पूर्ण करुन २० व्या वर्षात पदार्पण करत आहे. १३ सप्टेंबर २००४ ला याचा पहिला भाग प्रदर्शित झाला, असं महाराष्ट्राच्या लाडक्या भाऊजींनी सांगितलं. सध्या या मालिकेने २० व्या वर्षात पदार्पण केले आहे. आजही महाराष्ट्रातील महिला वर्ग भाऊजी आपल्याकडे कधी येतील याची वाट पाहत आहेत.