‘या’ दिवशी येणार Adipurush चं दुसर गाणं ‘राम सिया राम’

‘या’ दिवशी येणार Adipurush चं दुसर गाणं ‘राम सिया राम’

Adipurush New Song will Out : ‘आदिपुरुष’ (Adipurush) हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरला चाहत्यांनी मोठी पसंती देखील दिली आहे. नुकतचं या चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज करण्यात आलं होतं. ‘जय श्री राम’ असं या गाण्याचे बोल आहेत. रिलीज होताच या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

The Bageshwar Sarkar: ‘द बागेश्वर सरकार’… धीरेंद्र शास्त्रींवर आता सिनेमा येणार, कधी होणार रिलीज?

गीतकार मनोज मुंतसिर शुक्ला यांनी हे गाणं लिहिलं आहे. तर मराठीतील प्रसिद्ध संगीतकारांची जोडी अजय-अतुल यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर आणि पोस्टरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता या चित्रपटाचं पहिलं गाणं रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला गेली आहे.

Tina Turner Passed Away: दिग्गज संगीतकार टीना टर्नर यांचे निधन…

त्यानंतर आता या चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘राम सिया राम’ असे या गाण्याचे बोल आहेत. 29 मे 2023 ला हे गाणं या चित्रपटाच्या निर्मात्यांकडून रिलीज करण्यात येणार आहे. हे गाणं हिंदीसह तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. या गाण्याला सचेत-परंपरा या जोडीने संगीत दिलं आहे. तसेच गाणं गायलं देखाल त्यांनीच आहे. तर मनोज मुंतशिर यांनी हे गाणं लिहिलं आहे. 29 मे 2023 ला दुपारी 12 वाजता हे गाणं रिलीज करण्यात येणार आहे.

Pushpa 2 : या तारखेला रिलीज होणार अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 ! किंग खानच्या सिनेमाशी होणार टक्कर

गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेता प्रभासने (Prabhas) या सिनेमाचे एक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले होतं. या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले. प्रभासने या पोस्टरला खास कॅप्शन देखील दिले आहे. ‘मंगलमय हर भक्त होगा, जब आदिपुरुष का स्वागत होगा, One month to go! जय श्री राम’.

पोस्टरमध्ये प्रभासबरोबर देवदत्त नागे (Devdatta Nage) देखील दिसत आहे. प्रभास आदिपुरुष या सिनेमात श्री रामाची भूमिका साकारली आहे, तर देवदत्तनं या सिनेमात हनुमानाची भूमिका साकारली आहे. प्रभासनं शेअर केलेल्या आदिपुरुष सिनेमाच्या या नव्या पोस्टरला चाहत्यांनी देखील मोठी पसंती दिली आहे.

या सिनेमात अभिनेता प्रभास (Actor Prabhas) हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत दिसला आहे, तर अभिनेत्री क्रिती सेनॉन सीतेचे पात्र साकारत आहे. हैदराबादमध्ये ‘आदिपुरुष’ या सिनेमाच्या ट्रेलरचे खास स्क्रीनिंग करण्यात आले होते.त्यानंतर आता चाहत्यांसाठी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरच्या सुरुवातीला हनुमान हा गुहेत तपश्चर्या करत असल्याचे दिसत आहे. त्यानंतर मग श्रीराम, लक्ष्मण हे सीतेसह वनवासात जात असल्याचे देखील दिसून आले आहे.

आता हा सिनेमा 16 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘आदिपुरुष’ या सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यानंतर हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. टीझरमध्ये वापरण्यात आलेल्या व्हीएफएक्सवर जोरदार टीका होत होती. तसेच या सिनेमातील सैफच्या लूकवरूनही वाद निर्माण झाला. अनेकांनी सैफच्या लूकवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube