‘BMCM’कडून प्रेक्षकांची निराशा; तर अजयच्या ‘मैदान’चा धुराळा, जाणून घ्या कलेक्शन

‘BMCM’कडून प्रेक्षकांची निराशा; तर अजयच्या ‘मैदान’चा धुराळा, जाणून घ्या कलेक्शन

Maidaan Vs BMCM Box Office Collection Day 22: अजय देवगणचा (Ajay Devgan) स्पोर्ट्स ड्रामा ‘मैदान’ (Maidaan) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) टायगर श्रॉफच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ने (BMCM ) आता थिएटरमध्ये तीन आठवडे पूर्ण केले आहेत. बड्या स्टारकास्ट असलेल्या या दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरची (Box Office) कामगिरी खूपच निराशाजनक आहे.

जरी दोन्ही चित्रपटांचे दमदार ट्रेलर पाहिल्यानंतर, हे 2024 वर्षातील सर्वात मोठे ब्लॉकबस्टर ठरतील अशी अपेक्षा होती. बॉक्स ऑफिसवर ‘मैदान’ची कमाई अजूनही वाढत असली तरी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची अवस्था खूपच वाईट आहे. अक्षय कुमार आणि अक्षय देवगणच्या या चित्रपटांनी 22 व्या दिवशी किती कलेक्शन केले आहे चला तर मग जाणून घेऊया?

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ने 22 व्या दिवशी किती कमाई केली?

ईदच्या मुहूर्तावर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटगृहांमध्ये मोठ्या अपेक्षेने प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी दुहेरी अंकांची कमाई केली होती, त्यानंतर असे वाटत होते की हा चित्रपट अक्षय आणि टायगरची बुडती कारकीर्द वाचवेल. पण असे काहीही झाले नाही. यानंतर चित्रपटाच्या कमाईत दिवसेंदिवस घट होत गेली. या चित्रपटातून प्रेक्षकांना भरपूर ॲक्शन मिळाले पण कमकुवत कथेने या चित्रपटाचे नशीब उद्ध्वस्त केले आणि आता तिकीटाच्या मोजणीत प्रत्येक पैसा गमावत आहे. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचे तर, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ने पहिल्या आठवड्यात 49.9 कोटी रुपये आणि दुसऱ्या आठवड्यात 8.6 कोटी रुपये कमवले. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यातील तिसऱ्या गुरुवारच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ ने रिलीजच्या 22 व्या दिवशी फक्त 40 लाखांची कमाई केली आहे. यानंतर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चे 22 दिवसांचे एकूण कलेक्शन आता 62.45 कोटी रुपये झाले आहे.

निया शर्माचा खतरनाक लूक पाहून चाहत्यांना बसला धक्का; ‘सुहागन चुडैल’चा भयानक प्रोमो रिलीज

‘मैदान’ ने रिलीजच्या 22 व्या दिवशी किती कमाई केली?

ईदच्या मुहूर्तावर अजय देवगणचा स्पोर्ट्स ड्रामा ‘मैदान’ अक्षय-टायगरच्या ‘बडे मियाँ छोटे मियाँ’सोबत भिडला. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ला प्रेक्षकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला, तर ‘मैदान’च्या कथेचे खूप कौतुक झाले आणि अजय देवगणच्या अभिनयाचेही सर्वांनी कौतुक केले. असे असूनही ‘मैदान’ही विशेष कलेक्शन करू शकलेला नाही.

रिलीज होऊन तीन आठवडे पूर्ण होऊनही चित्रपट निम्माही खर्च वसूल करू शकलेला नाही. मात्र, तिसऱ्या आठवड्यात ‘मैदान’ने बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी वाढ दाखवली आणि 21व्या दिवशी चित्रपटाने कोटींची कमाईही केली. चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर ‘मैदान’ची पहिल्या आठवड्याची कमाई 28.35 कोटी रुपये आणि दुसऱ्या आठवड्याची कमाई 9.95 कोटी रुपये आहे. आता या चित्रपटाच्या रिलीजच्या तिसऱ्या आठवड्यातील तिसऱ्या गुरुवारच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. Sacknilk च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘मैदान’ ने रिलीजच्या 22 व्या दिवशी 55 लाखांची कमाई केली आहे. यासह ‘मैदान’चे 22 दिवसांचे एकूण कलेक्शन आता 45.65 कोटी रुपये झाले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube