Bholaa : …म्हणून अजय देवगण पोहचला टीम इंडियाला चिअर्स करायला

Bholaa : …म्हणून अजय देवगण पोहचला टीम इंडियाला चिअर्स करायला

मुंबई : अजय देवगणचा आगामी चित्रपट भोला लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या दरम्यान आता अजय देवगण थेट भारत-ऑस्टेलिया एकदिवसीय सामन्यामध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडिअमवर टीम इंडियाला चिअर्स करायला गेल्याचं पाहायला मिळालं. यावेळी सामना पाहण्याचा आनंद घेतच त्याने आपल्या आगामी चित्रपट भोलाचं प्रमोशन केलं.

अजय देवगणचा आगामी चित्रपट भोलाबद्दल सांगायचं झालं तर ‘दृश्यम 2’ च्या यशानंतर सुपरस्टार अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘भोला’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तब्बूसोबत ‘भोला’ मध्ये अजय देवगण धमाल करताना दिसणार आहे. बहुप्रतिक्षित भोला चित्रपटाच्या ट्रेलर आणि चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चाहते आतुरतेने वाट पाहत होते. त्यानंतर या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून चित्रपटाचा ट्रेलरची डेट जाहीर केली होती.

या ट्रेलरबद्दल सांगायचे झाले तर ही एका ड्रग माफियाच्या अवती-भोवती फिरणारी कथा आहे. चित्रपटात बाप-लेकीमध्ये असलेलं बॉन्डिंगही दाखवण्यात आलं आहे. तर चित्रपटात अजय देवगनसह पुन्हा एकदा तब्बू स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. तसेच दीपक डोबरियाल आणि शरद केळकर यासारखे दिग्गज कलाकार दिसणार आहेत. यामध्ये तब्बू एका पोलीस ऑफिसरच्या भूमिकेत आहे. तर दीपक डोबरियाल खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

Review : मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे – राणी मुखर्जीचा दमदार परफॉर्मन्स, पटकथा मात्र…

अजय हा एक उत्तम अभिनेता तर आहेच पण तो एक उत्तम चित्रपट दिग्दर्शकही आहे. भोला हा अजयचा दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेता म्हणून चौथा चित्रपट आहे. हा चित्रपट दक्षिण चित्रपट ‘कैथी’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा अजयसोबत तब्बूची जोडी पाहायला मिळणार आहे. याशिवाय दीपक डोबरियाल, गजराज राव आणि विनीत कुमारही या चित्रपटात आहेत. अजयने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. हा चित्रपट 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube