Aliaa and Ranveer : ‘या’ दिवशी येणार आलियाचा ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’

Untitled Design   2023 02 02T154831.761

मुंबई : यावर्षीचा बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेला चित्रपट म्हणजे ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. पण आलिया भट आणि रणवीर सिंहच्या या चित्रपटाची चाहत्यांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. कारण या चित्रपटाची रिलीजची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt 💛 (@aliaabhatt)

करण जौहर आणि अभिनेत्री आलिया भटने याबद्दल पोस्ट करत माहिती दिली. आता ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट एप्रिल ऐवजी जुलै महिन्यात रिलीज होणार आहे. 28 जुलै 2023 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटाला येणार आहे.

आलियाने या चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल माहिती देणाऱ्या या पोस्टमध्ये लिहीले की, ‘ रॉकी और रानी की प्रेम कहानी’, रिलीजींग 28 जुलै 2023, चित्रपटगृहात भेटू’. करण जौहरने या चित्रपटाच्या रिलीज डेटबद्दल माहिती देणाऱ्या या पोस्टमध्ये लिहीले की, असं म्हणतात संयमाचं फळ गोड असते, म्हणून या खास कथेची गोडी वाढवण्यासाठी, आम्ही खूप प्रेम घेऊन येत आहोत! रॉकी आणि रानीची कुटुंबं तयार होत आहेत आणि आता पहा प्रेमाची ही अनोखी कहाणी! 28 जुलै 2023 रोजी सिनेमागृहात ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी.’

Tags

follow us