Big B अन् थलायवाची धमाकेदार जोडी पुन्हा दाखवणार जलवा; ‘या’ सिनेमात दिसणार एकत्र 

Big B अन् थलायवाची धमाकेदार जोडी पुन्हा दाखवणार जलवा; ‘या’ सिनेमात दिसणार एकत्र 

Amitabh Bachchan And Rajinikanth Movie : मनोरंजनसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) म्हणजे बिग बी आणि रजनीकांत (Rajinikanth) म्हणजेच सर्वांचा लाडका थलायवा यांची गणना होत असते. दोघांनी देखील त्यांच्या सिनेसृष्टीतीच्या प्रवासामध्ये एकापेक्षा एक जबरदस्त सिनेमे दिले आहेत. दोघांचा देखील चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, त्यांच्या सिनेमाची चाहते देखील मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)


आता 32 वर्षांनी बिग बी अन् थलायवा एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा होत आहे. ‘हम’, ‘अंधा कानून’ आणि ‘गिरफ्तार’सारख्या सिनेमामध्ये बिग बी आणि थलायवा पुन्हा एकदा एकत्र दिसले होते. पण गेल्या तीन दशकांत दोघांनी एकत्र काम केले नाही. आता मिळालेल्या माहितीनुसार 32 वर्षांनी थलायवा आणि अबिग बी एकत्र स्क्रिन शेअर करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे आता त्यांच्या जोडीला पुन्हा एकत्र बघण्यासाठी चाहते मोठ्या उत्सुकतेमध्ये  आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajinikanth (@rajinikanth)


तसेच बिग बी आणि रजनीकांत पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. दोघे 32 वर्षांनी स्क्रिन शेअर करत असताना दिसून येणार आहेत. ‘जेलर’ आणि ‘लाल सलाम’ या सिनेमाच्या शूटिंगनंतर थलायवा टीजे ग्रानवेल दिग्दर्शित ‘जय भीम’ या सिनेमाचे शूटिंग पूर्ण करणार असल्याची माहिती मिळाली आहे. ‘थलाइवर 170’ हा रजनीकांतचा 170 वा सिनेमा आहे. यामुळे सिनेमाचे नाव ‘थलाइवर 170’ ठेवण्यात आले आहे.

‘थलाइवर 170’ या सिनेमात बॉलिवूडचे महानायक बिग बी महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. बिग बी अगोदर ‘पोन्नियिन सेल्वन’ या सिनेमातील चियान विक्रम यांना या सिनेमासाठी विचारणा झाली होती. पण आता या सिनेमात बिग बी आणि थलायवा एकत्र दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. ‘थलाइवर 170’ या सिनेमाच्या शूटिंगला यावर्षाच्या शेवटी सुरुवात होणार आहे. या सिनेमात टॉलिवूड अभिनेता सूर्याची देखील झलक एकत्र दिसणार आहे.

Prashant Damle: यशवंतराव चव्हाण नाट्य संकुल नाट्यरसिक आणि कलावंतांसाठी होणार खुले

थलायवा या सिनेमामध्ये पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. बिग बी यांचा आगामी ‘प्रोजेक्ट के’ हा सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामध्ये अमिताभ बच्चनबरोबर दीपिका पादुकोण आणि प्रभास देखील दिसून येणार आहेत. तसेच टायगर श्रॉफच्या ‘गणपत पार्ट 1’मध्येही ते दिसून येणार आहेत. तसेच रिभू दासगुप्ता दिग्दर्शित ‘सेक्शन 84’ या सिनेमात ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या ते याच सिनेमाचं शूटिंग करत आहेत. तर दुसरीकडे थलायवाचे अनेक सिनेमे सध्या पाईपलाईनमध्ये आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube