Amruta Fadnavis: ‘मेरे राम…’ अमृता फडणवीस यांचं हे नवं गाणं ऐकलंत का? नेटकरी म्हणाले…

Amruta Fadnavis: ‘मेरे राम…’ अमृता फडणवीस यांचं हे नवं गाणं ऐकलंत का? नेटकरी म्हणाले…

Amruta Fadanvis Mere Ram Song Release: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) काही ना काही कारणामुळे कायम जोरदार चर्चेत असतात. बरेचदा त्यांच्या चर्चेत येण्याचं कारण त्यांचं गाणं हे असतं. त्या एक उत्तम गायिका देखील आहेत. यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. त्यांची गाणी सोशल मीडियावर (social media) सतत चर्चेत असतात. त्यांचं ‘मेरे राम’ हे (Mere Ram Song ) नवं गाणं राम नवमीच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)


अमृता फडणवीस यांचं हे गाणं सध्या समोर आला असून तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या गाण्याबरोबरच व्हिडीओमधील त्यांच्या ग्लॅमरस लूकची देखील चर्चा होत आहे. अमृता फडणवीस यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांच्या या नवीन गाण्यात त्यांना कैलाश खेर यांनी देखील साथ दिलीये. त्यामुळे सोशल मीडियावर अमृता फडणवीसांच्या गाण्याची चर्चा बरीच चर्चा रंगत आहे.

याआधी देखील महाशिवरात्रीच्या निमित्ताने अमृता फडणवीस आणि शंकर महादेवन यांनी गायलेले‘देवाधी देवा’ गाणे रिलीज झाले होते. मात्र चर्चा सुरू झाली ती देवेंद्र फडणवीस यांच्या गणायची. देवाधीदेवा या गाण्याचे बोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लिहले आहेत. यामुळे उपमुख्यमंत्री ते आता गीतकार झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

कपिल शर्माने गमावली ‘या’ सिनेमात काम करण्याची संधी; म्हणाला, ‘रात्रभर रडलो पण…’

उपमुख्यमंत्र्यांचे ‘हे’ धमाकेदार लुक्सही चर्चेत अमृता फडणवीस यांच्या या नव्या गाण्याची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. अलिकडेच त्यांनी आपल्या या नव्या गाण्याचा पोस्टर शेअर केला होता. या पोस्टमधील त्याचा लूक पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं होतं. आतापर्यंत अमृता फडणवीस यांनी रोमँटिक प्रकारातील गाणी गायली आहेत. पण ‘रामाच्या भक्तीत दंग झाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अनेकांनी जय श्रीराम म्हणत त्यांच्या गाण्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज