Amruta Fadnavis: आशा भोसलेंनी अमृता फडणवीसांना दिला सल्ला, म्हणाल्या “तू आणखी सराव कर अन्…”

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 13T164924.989

Amruta Fadnavis: गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मधुर स्वरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या आशा भोसले (Asha Bhosle) यांना नुकताच राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने (Maharashtra Bhushan Award) सन्मानित करण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अर्धांगिनी नेहमीच चर्चेत असतात. परंतु आता ते आशा भोसले यांची भेट घेतल्याने चांगलीच चर्चा केली जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)


यामुळे अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis) त्यांच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट (Instagram Post ) शेअर केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या पत्नी अमृता फडणवीस यांना समाजसेविका आणि गायिका म्हणूनही ओळखले जातात. त्या सोशल मीडियावर सततच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये त्यांनी आशा भोसले यांच्यासोबतचे दोन फोटो पोस्ट करण्यात आल्या आहेत.

यामध्ये एका फोटोत आशा भोसले आणि अमृता फडणवीस छान हसत असल्याचा दिसून येत आहेत. तर दुसऱ्या फोटोतमध्ये त्या दोघीही एकमेकांशी संवाद साधताना बघायला मिळत आहे. दरम्यान आशा भोसले यांना शुक्रवारी (२४ मार्च रोजी) सायंकाळी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया या ठिकाणी राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

२०२१ या सालासाठी आशा भोसले यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. २५ लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारचे स्वरूप आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘महाराष्ट्र भूषण २०२१’ हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

Sanjay Dutt Injured : दुखापतीनंतर संजय दत्तच्या प्रकृतीबद्दल महत्त्वाची अपडेट समोर

नुकतेच त्यांनी आशा भोसले यांना भेटले आहे. राज्याचा सर्वोच्च पुरस्कार असलेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन देखील केले आहे. यावेळी मी त्यांच्यासोबत संगीतविषयी छान संवाद देखील साधला आहे. यावेळी त्यांनी मला सराव आणि व्हॉईस मॉड्युलेशनविषयी मार्गदर्शन केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. आता आम्ही पुढील संगीत सत्रासाठी खूप उत्सुक आहोत”, असे कॅप्शन अमृता फडणवीस यांनी आपल्या पोस्टला दिला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube