Fathers Day: ‘माझा सुपरहिरो आणि त्याची ही सुपर पॉवर मला..’; अमृता खानविलकरचा बाबांसाठी खास मेसेज

Fathers Day: ‘माझा सुपरहिरो आणि त्याची ही सुपर पॉवर मला..’; अमृता खानविलकरचा बाबांसाठी खास मेसेज

Amruta Khanvilkar On Fathers Day: अमृताने आजवर तिच्या अभिनयाने आणि नृत्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे. (Amruta Khanvilkar) अमृताचे अनेक सिनेमे गाजले आहे. अमृताचा ‘चंद्रमुखी’ हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या सिनेमातील अमृताच्या कामाचे प्रचंड कौतुक झाले. (special message) या सिनेमात अमृता चंद्राच्या भूमिकेत होती. आता जन्म देण्यापासून ते अगदी पुढे जाऊन आपल्या आयुष्यातल्या महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यापर्यंत जो बॅक सपोर्टवर असतो तो म्हणजे आपला बाबा ! आजच्या फादर्स डे (Fathers Day) निमित्ताने अभिनेत्री अमृता खानविलकर हिने हिच्या बाबा साठी खास भावना व्यक्त केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Khanvilkar (@amrutakhanvilkar)


अमृता तिच्या बाबा बद्दल काय बोलली?

अमृता ने हिंदी आणि मराठीत तिच्या ग्लॅमरस अंदाजाने आणि अभिनयाने कायम प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे आणि ती नुकतीच तिच्या आई बाबा सोबत एका खास लंडन ट्रीप ला सुद्धा गेली होती अमृता तिच्या बाबा बद्दल बोलताना म्हणते ” माझे वडील एक स्व-शिक्षित सकारात्मक व्यक्ती आहेत ज्यांनी एकट राहून आनंदी राहण्याची कला साध्य केली आहे. त्यांना प्रवासाची आवड आहे आणि एकटे राहूनही आनंद कसा मिळवायचा हे मी त्यांचा कडून शिकले आहे. या गोष्टीचं त्यांची एक मुलगी म्हणून मला फार कौतुक आहे. बाबा कडून मी एक खूप खास गोष्ट शिकले ती म्हणजे की आनंद हा bआतून येतो आणि एकटे राहण्याचा अर्थ एकटे असणे नाही. जेव्हा मी बाबांच्या वयात येईन तेव्हा त्यांच्यासारखा फक्त दोन टक्के आनंद मिळवू शकले तरी मी स्वतःला खूप नशीबवान समजेन.

आपण सगळेच आपल्या आई बाबा कडून अनेक गोष्टी शिकत असतो आणि बाबा कडून शिकताना मला समजल की आनंद ही एक निवड आहे आणि एकांत स्वीकारल्यामुळे सखोल आत्म-शोध आणि वैयक्तिक वाढ होऊ शकते. एकटे असूनही आपण समाधानी आणि उत्साही कसे राहू शकतो हा धडा माझ्यासाठी अमूल्य आहे आणि मी तो माझ्या स्वतःच्या जीवनात समाविष्ट करते. त्यांचा सारखं समाधानी आणि आनंदाच्या फक्त एका अंशाला जरी पोहचले तरी मी स्वतःला खूप नशीबवान समजेन. ”

अमृता कितीही शूट मध्ये व्यस्त असली तरी ती तिचा फॅमिली टाईम कायम वेगवेगळ्या गोष्टीतून स्पेड करताना दिसते मग ती ट्रीप असू दे किंवा आई बाबा सोबतचा खास वेळ असो ती कुटुंबासोबत नेहमीच सोबत राहते आणि यातून तिचं तिच्या बाबा सोबतच खास नात देखील पहायला मिळतं.

रेड गाऊनमध्ये Amruta Khanvilkar च्या अदा; पाहा चाहत्यांना घायाळ करणारे फोटो

अमृताने आजवर अनेक प्रोजेक्ट्स मधून सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवल आहे. 2024 वर्षात ती अनेक उत्कठावर्धक प्रोजेक्ट्स मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे सोबतीला आता एका नव्या कार्यक्रमच जजिंग सुद्धा ती करणार आहे. 36 डे , कलावती , ललिता बाबर आणि पठ्ठे बापूराव या सारख्या लक्षवेधी प्रोजेक्ट्स मधून अमृता पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांना भेटायला येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज