Animal Teaser : अनिल कपूर-रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ टीझरला प्रेक्षकांची भरभरून पसंती
Animal Teaser Out : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor)आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana)यांच्या बहुप्रतिक्षित अॅनिमल चित्रपटाचा टीझर (Animal Teaser Out)नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटामधील फर्स्ट लूकच्या प्रदर्शनानंतर रणबीरचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच आज रणबीरच्या वाढदिवसाचे औचित्य साधून चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. अॅनिमल चित्रपटाचा टीझर धमाकेदार आहे.
Ritabhari Chakraborty च्या ‘नंदिनी’ चा टीझर आला; चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली…
या टीझरला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. एका दिवसांत या टीझरा 26 मिलियन व्ह्युज मिळाले आहेत. ‘अॅनिमल’च्या टीझरमध्ये रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल हटके अंदाजात पाहायला मिळाले. या टीझरमध्ये धमाकेदार अॅक्शन पाहायला मिळत आहे. टीझरमध्ये सुरुवातीलाच रणबीर आणि रश्मिका दोघेही एकमेकांशी बोलताना दिसत आहेत. त्याचवेळी रश्मिका ही रणबीरच्या वडिलांचा विषय छेडते, त्याबद्दल बोललल्यानंतर रणबीरच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. ते बोललेलं रणबीरला काही आवडत नाही.
Ahmednagar News : नवऱ्याला दारुचं व्यसन; पत्नी अन् भावानेच काढला काटा…
त्यानंतर पुढच्या फ्रेममध्ये अनिल कपूर खुर्चीवर बसलेल्या तरुण रणबीरचा गाल लाल करताना दिसत आहेत. त्यानंतर रणबीर त्याच्या वडिलांबद्दल म्हणजेच अनिल कपूरच्या विरोधात बोललेलं चालणार नाही, अशा आशयाचं बोलून तो रश्मिकावर चिडताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर रणबीरसह काहीजण तोडफोड करताना दिसत आहेत. शेवटी बॉबी देओल बिनाशर्टचा पाहायला मिळाला. या चित्रपटामध्ये रणबीर कपूर आक्रमक भूमिका घेतानाही दिसत आहे.
Gautami Patil : गौतमी आली अन् नाचून गेली; पोलिसांनी दिला दणका…
अॅनिमल चित्रपट संदीप रेड्डी वंगा यांनी दिग्दर्शित केला आहे. सुरुवातीला हा चित्रपट ऑगस्टमध्येच रिलीज होणार होता. त्यानंतर ही रिलीजची तारीख बदलून आता तो 1 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये एकूण सात गाणी असल्याचे संदीप रेड्डी यांनी सांगितले आहे. ‘अॅनिमल’ हिंदी, तामिळ, कन्नड, तेलगू आणि मल्ल्याळम अशा पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे.