खतरनाक व्हिलनसोबत अ‍ॅंट-मॅनचा सामना, ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘क्वॉंटमॅनिया’

खतरनाक व्हिलनसोबत अ‍ॅंट-मॅनचा सामना, ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘क्वॉंटमॅनिया’

मुंबई : मार्वलची सुपरहीरो फिल्म सीरीज ‘अ‍ॅंट-मॅन अ‍ॅंड द वास्प : क्वॉंटमॅनिया’ (अ‍ॅंट-मॅन 3) चा दमदार ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. यूट्यूबवर चित्रपटाचा ट्रेलर मार्वलच्या चाहत्यांना खुप आवडला आहे. हॉलिवूड स्टार पॉल रुड या चित्रपटातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमण करत आहे. अ‍ॅंट-मॅन 3 मध्ये प्रेक्षकांना अ‍ॅक्शन, ड्रामा आणि शानदार व्हिएफएक्स पहायला मिळणार आहे. यावेळी अ‍ॅंट-मॅनचा सामना जगातील सर्वात खतरनाक व्हिलनसोबत होणार आहे.

पुढच्या महिन्यात 17 फेब्रुवारीला ‘अ‍ॅंट-मॅन अ‍ॅंड द वास्प : क्वॉंटमॅनिया’ भारतासह जगभरातील चित्रपटगृहातील रिलीज होणार आहे. या चित्रपटासाठी
भारतीय चाहते आतापासूनच अ‍ॅडव्हान्स बुकिंग करत आहेत. यावरून अंदाज लावला जाऊ शकतो की, या चित्रपटाचं भारतात देखील कीती क्रेज आहे. ‘अ‍ॅंट-मॅन अ‍ॅंड द वास्प : क्वॉंटमॅनिया’ आतापर्यंतच्या सर्वांत शक्तिशाली व्हिलन कांग द कॉन्करर (जोनाथन मेजर्स) ची चाहत्यांना ओळख होणार आहे.

‘अँट-मॅन 3’ मध्ये सुपरहिरो पार्टनर स्कॉट लँग (पॉल रुड) आणि होप व्हॅन डायन (इव्हेंजेलिन लिली) यांना अँट-मॅन आणि द वास्प म्हणून त्यांचे साहस सुरू ठेवण्यासाठी एकत्र येताना दिसणार आहोत. ते होपचे पालक जेनेट व्हॅन डायन (मिशेल फिफर) आणि हँक पिम (मायकेल डग्लस) आणि स्कॉटची मुलगी कॅसी लँग (कॅथरीन न्यूटन) सोबत एका नवीन साहसाला सुरुवात करतात, जिथे ते खलनायक कांग द कॉन्कररला भेटतात. याशिवाय अँट-मॅनला तेथे राहणाऱ्या विचित्र नवीन प्राण्यांनाही सामोरे जावे लागणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube