ऑस्करच्या शर्यतीत ‘अनुजा’, अभिनेते नागेश भोसले म्हणतो, उत्तम टीम अन्…

  • Written By: Published:
ऑस्करच्या शर्यतीत ‘अनुजा’, अभिनेते नागेश भोसले म्हणतो, उत्तम टीम अन्…

Oscar 2025 : गेल्या काही दिवसांपासून ऑस्कर 2025 (Oscar 2025) सोशल मीडियावर जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. पुढील वर्षी ऑस्कर 2025 सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. या सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व ‘अनुजा’ (Anuja) करणार आहे. ‘अनुजा’ ने यंदा लघुपट श्रेणीत स्थान मिळवले आहे. माहितीनुसार, ‘लाइव्ह-अ‍ॅक्शन’ शॉर्ट फिल्ममध्ये 180 शॉर्ट फिल्मसमधून ‘अनुजा’ ची निवड करण्यात आली आहे. सुचित्रा मटाई यांनी ‘अनुजा’ची निर्मिती केली आहे. तर गुनीत मोंगा या लघुपटाच्या कार्यकारी निर्मात्या आहेत.

अनुजा’ वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर आधारित आहे. ‘अनुजा’ची स्टोरी एका भारतीय मुलीवर आधारित असून इंडो-अमेरिकन प्रोडक्शन अंतर्गत त्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या लघु चित्रपटामध्ये मराठी अभिनेते नागेश भोसले तसेच सजदा पठाण, अनन्या शानभाग, गुलशन वालिया, सुशील परवाना, सुनीता भादुरीया, जुगल किशोर, पंकज गुप्ता, रोडॉल्फो राजीव हुर्बेट सारख्या कलाकारांनी अभिनय केला आहे. तर एडम.जे.ग्रेव्स यांनी या लघु चित्रपटाला दिग्दर्शित केले आहे. ऑस्करच्या लघुपट श्रेणीत ‘अनुजा’ लघुपटाला स्थान मिळाल्याबद्दल अभिनेते नागेश भोसले यांनी आनंद व्यक्त केला आहे.

यावेळी नागेश भोसले म्हणाले की , ‘ऑस्कर सारख्या मानाच्या सोहळ्यात आपला लघुपट असणे ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. बालमजुरी सारखा सामाजिक प्रश्न या लघुपटातून अत्यंत प्रभावीपणे मांडला असून एका उत्तम टीमचा भाग होता आल्याचा आनंद निश्चित आहे’.

आश्वासने पूर्ण करणार अन् शेरो शायरी म्हणत ठाकरेंना टोला, सभागृहात शिंदेंची जोरदार फटकेबाजी

97  व्या ऑस्कर पुरस्कार-2025 च्या पुरस्कारासाठीची नामांकने 17 जानेवारीला जाहीर होणार आहेत. ऑस्कर पुरस्कार सोहळा 2 मार्च रोजी होणार आहे. यामध्ये विजेते घोषित केले जातील. त्यात ‘वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर भाष्य करणारा ‘अनुजा’ लघुपट बाजी मारतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या