Vijay 69 : त्यांच्या शिकवणीमुळे मी आहे, अभिनेते अनुपम खेर यांची त्यांच्या आई दुलारी यांना ट्रिब्यूट

  • Written By: Published:
Vijay 69 : त्यांच्या शिकवणीमुळे मी आहे, अभिनेते अनुपम खेर यांची त्यांच्या आई दुलारी यांना ट्रिब्यूट

Vijay 69 : नेटफ्लिक्स आणि YRF एंटरटेनमेंटचा ‘विजय 69’ (Vijay 69)ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यांच्या विविधरंगी भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अनुपम खेर यांनी सांगितलं की त्यांचा नवीन प्रॉजेक्ट ‘विजय 69‘ त्यांच्या आई दुलारी यांना अर्पण आहे. हा चित्रपट एका 69 वर्षांच्या व्यक्तीची प्रेरणादायक कहाणी सांगतो, जीवनात कठीण संघर्ष करत पूर्ण केलेल्या स्वप्नाचा हा पट आहे.

Dr.Veena Dev Passed Away: मोठी बातमी! ज्येष्ठ लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांचे निधन

अनुपम खेर म्हणतात, “विजय 69 ही माझ्या आई दुलारी यांना माझ्याकडून सलाम आहे. त्यांचा जगण्याचा उत्साह, प्रत्येक दिवस उत्साहपूर्ण जगण हे सगळ मला प्रेरणा देत राहतं. मी आज जो काही आहे, तो त्यांच्या शिकवणीमुळे आहे, आणि त्यांच्याकडूनच मला कधीच हार न मानण्याची वृत्ती मिळाली आहे. त्यांनी मला शिकवले की, कधीही मागे फिरू नकोस असंही खेर म्हणाले आहेत.

तमन्ना भाटिया पुन्हा चर्चेत आज की रात  गाण्याचा पूर्ण व्हिडिओ रिलीज

जेव्हा मी पटकथा वाचली, तेव्हाच मला माझ्या आईची आठवण आली आणि मी या चित्रपटासाठी तयार झालो. प्रत्येक दिवशी मी त्यांच्याकडून शिकलेल्या गोष्टी अनुसरल्या: कधीही हार मानू नकोस, स्वतःवर विश्वास ठेव, आणि कोणत्याही परिस्थितीत पुढे चालत राहा. हा चित्रपट त्यांच्या व माझ्यासारख्या अनगिनत वीरांना समर्पित आहे, जे दररोज शांतपणे त्यांच्या संघर्षात विजय मिळवतात. त्या माझ्या सर्वोत्तम गुरू आहेत, आणि माझ्या यशाचे श्रेय त्यांच्या मार्गदर्शनालाच जाते असंही ते म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube