Dr.Veena Dev Passed Away: मोठी बातमी! ज्येष्ठ लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांचे निधन

  • Written By: Published:
Dr.Veena Dev Passed Away: मोठी बातमी! ज्येष्ठ लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव यांचे निधन

Dr.Veena Dev Passed Away: प्रसिध्द साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या आणि लेखिका, समीक्षक डॉ. वीणा देव (वय 76) (Dr.Veena Dev) यांचे आज निधन झाले आहे. डॉ. वीणा देव अभिनेत्री मृणाल कुलकर्णी (Mrinal Kulkarni) यांच्या मातोश्री होत. काही दिवसांपासून ते आजारी होत्या.

डॉ.वीणा विजय देव या प्रसिद्ध साहित्यिक गो. नी. दांडेकर यांच्या कन्या होत. पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात त्यांनी मराठी विभागप्रमुख काम केले. तेथे त्यांनी 32 वर्षे अध्यापनाचे कार्य केले. मराठी कथा-कादंबऱ्यांची नाट्यरूपे या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी त्यांना पीएच.डी. ही पदवी मिळाली.

लेखन, संकलन आणि संपादन हे साहित्याचे विविध प्रकार त्यांनी लीलया हाताळले असून, या संदर्भातील त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘कधीकधी’, ‘परतोनी पाहे’, ‘स्त्रीरंग’, ‘विभ्रम’, ‘स्वान्सीचे दिवस’ हे त्यांचे लेखसंग्रह वाचकप्रिय आहेत. ‘स्मरणे गोनिदांची’ हा स्मरणग्रंथ आणि यशवंत देव आणि डॉ. ह. वि. सरदेसाई यांची वीणा देव यांनी संपादित केलेली दोन सर्वार्थानी देखणी पुस्तके आहेत.

तसेच त्यांनी गो. नी.दांडेकर यांच्यावर लिहिलेल्या ‘आशक मस्त फकीर’ या व्यक्तिचित्रास महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट ललित साहित्य निर्मितीचा पुरस्कार मिळाला. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी राजभाषा सल्लागार समितीच्या त्या माजी सदस्य राहिल्या आहेत. वीणा देव यांना मोरया गोसावी जीवनगौरव पुरस्कार तसेच साईरंग प्रतिष्ठानतर्फे कर्तृत्वगौरव पुरस्कार देण्यात आला. डॉ. वीणा देव ठाणे जिल्हा आणि विटा येथील ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा राहिल्या आहेत. साहित्य आणि कला क्षेत्रात विविध विषयांवर अनेक ठिकाणी त्यांनी व्याख्याने दिली आहेत.

मुलाखती घेणे, सूत्रसंचालन याद्वारे त्यांचा आकाशवाणी, दूरदर्शनवर सहभाग राहिला आहे. 1975 पासून गो. नी. दांडेकर लिखित विविध कादंबऱ्यांच्या अभिवाचनाचे 650 हून अधिक कार्यक्रम त्यांनी केले आहेत. तसेच गो.नी.दा. यांच्या स्मरण-जागरणासाठी विजय देव यांच्या मदतीने त्या मृण्मयी पुरस्कार, दुर्ग साहित्य संमेलन, गो.नी.दा. यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन अशांसारखे अनेक उपक्रम राबवीत असतात. त्यांच्या मृण्मयी प्रकाशनातर्फे त्यांनी गो.नी.दा. यांच्या दुर्मीळ साहित्यकृती प्रकाशित केलेल्या आहेत.

LAC वर मोठी घडामोड, भारत-चीन सैन्याची माघार, ‘हे’ आहे कारण

वीणा देव यांचे प्रा. विजय देव यांच्याबरोबर लग्न झाले होते. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे म्हणून डॉ. विजय प्रल्हाद देव यांनी काम केले होते. त्यांची राज्यशास्त्राचे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, लेखक अशी ओळख होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube