विजयी शंखनाद झालाय…भोसरीत महेश लांडगेंनी भरला उमेदवारी अर्ज, प्रचाराला केली सुरूवात
BJP Mahesh Landge Filed Nomination Form In Bhosari : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे. या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवार महेश लांडगे ( Mahesh Landge) यांनी आज मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांनी भाजपा-शिवसेना- राष्ट्रवादी-आरपीआय- मित्र पक्ष महायुतीच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदार संघातून अधिकृत उमेदवारी (BJP) अर्ज दाखल केला.
यावेळी माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव, माजी महापौर मंगला कदम यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेना नेते इरफान सय्यद उपस्थित (Assembly Election 2024) होते. ‘‘10 वर्षे विकासाची.. निरंतर विश्वासाची..’’ या ध्येयाने ही निवडणूक विकासाच्या मुद्यांवर आम्ही लढवत आहोत. पिंपरी-चिंचवडकरांच्या हितासाठी अविरतपणे काम करीत राहीन, असा शब्द देतो. ग्रामदैवतांसमोर नतमस्तक होवून आणि वडीलधाऱ्यांचे आशिर्वाद घेवून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सकाळी निवासस्थानापासून रॅलीला सुरूवात झाली.
माझ्या आयुष्यात पहिल्यांदा माझ्याविरोधात मुलानेच खटला भरला; पक्षातील बंडखोरीवर पवार थेटच बोलले
आपण सर्व सहकारी, मित्र परिवार आणि हितचिंतकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आपले आशिर्वाद आणि साथ यामुळे विजयी शंखनाद झाला आहे. आपले मन:पूर्वक आभार व्यक्त करतो. अजेय भारत.. अजेय महायुती, असं म्हणत महेश लांडगे यांनी प्रचाराला सुरूवात केलीय. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चं बिगुल आता वाजलंय. राज्यात एकाच टप्प्यामध्ये निवडणूक होणार आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे.
आई सांगते माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका तरी…अजित पवारांना अश्रू अनावर, युगेंद्र पवार काय म्हणाले?
याच पार्श्वभूमीवर महायुती अन् महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी केली जातेय. त्यातच आता अजित पवार गटाचे भोसरीतील माजी आमदार विलास लांडे शरद पवार गटाचा प्रचार करणार आहेत. महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाने भोसरीत अजित गव्हाणे यांना रिंगणात उतरवलं आहे.