अर्चना पूरण सिंग यांचा मुलगा आयुष्मान ‘क्रेडिट कार्ड स्कॅम’चा बळी; गमावले 87 हजार

Archana Puran Singh : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री अर्चना पूरण सिंग यांचा मुलगा आयुष्मान सेठी ऑनलाइन फसवणुकीचा बळी ठरला आहे.

Archana Puran Singh

Archana Puran Singh : सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री अर्चना पूरण सिंग यांचा मुलगा आयुष्मान सेठी ऑनलाइन फसवणुकीचा बळी ठरला आहे. त्याची तब्बल 87 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली असल्याची आयुष्मान सेठीचा मोठा भाऊ आर्यमन सेठीने एका यूट्यूब चॅनेलवर दिली आहे.

आर्यमन सेठीने (Aryaman Sethi) यूट्यूबर अपलोड केलेल्या व्लॉगमध्ये आयुष्मान (Ayushman Sethi) घाबरलेला दिसून येत आहे. आयुष्मान आता फसवणूक करणाऱ्यांचा नियमित ग्राहक बनला आहे कारण यापूर्वी देखील अशाच एका फसवणुकीत त्याने 80 हजार रुपये गमावले होते असं आर्यमन सेठी म्हणताना दिसत आहे. तर आयुष्मान म्हणतो की, माझ्या क्रेडिट कार्डमधून 87 हजार रुपये काढून घेण्यात आले आहेत. यावर अर्चना पूरण सिंग देखील प्रतिक्रिया देताना दिसते. कार्ड ब्लॉक कर, क्रेडिट कार्ड कंपनीला फोन कर असं अर्चना म्हणते. तर यावर बोलताना आयुष्मान म्हणतो की, 7 दिवसांच्या फ्री ट्रायलच्या (free trial) नावाखाली त्यांनी संपूर्ण वार्षिक शुल्क कापून घेतले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमादरम्यान गोळीबार; पंतप्रधान मोदी म्हणाले, लोकशाहीत…

तर आयुष्मानचे वडील वडील परमीत सेठी म्हणतात की, कार्ड ब्लॉक करू नकोस ते पेमेंट रद्द (cancel) कर. यावर आयुष्मान विचारतो की, तो पर्याय मला कुठे मिळेल? या प्रश्नामुळे संपूर्ण कुटुंब हसून लोटपोट झाले. त्यानंतर, आपल्या भावाची चेष्टा करत आर्यमन म्हणाला, आई-वडिलांकडून तुला हे पैसे परत मिळणार नाहीत. अर्चनानेही त्यात भर घालत म्हटले, ते पैसे आता पूर्णपणे तुझ्याच माथी आहेत. स्वतःचा बचाव करत आयुष्मानने तत्काळ प्रत्युत्तर दिले, मी हे बाबांसाठीच केले होते.

follow us