शाहिद कपूर साकारणार Ashwatthama; शाहिदची आजवरची संस्मरणीय भूमिका ठरणार?

शाहिद कपूर साकारणार Ashwatthama; शाहिदची आजवरची संस्मरणीय भूमिका ठरणार?

Ashwatthama The Saga Continues : अखेर अश्वत्थामा : द सागा कंटिन्यूअस ( Ashwatthama The Saga Continues ) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज आहे. मात्र यात मुख्य भूमिकेत अभिनेता विकी कौशल ऐवजी अभिनेता शाहिद कपूर ( Shahid Kapoor) दिसणार आहे. नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राईम व्हिडिओ इंडियाने एका कार्यक्रमामध्ये या चित्रपटाची घोषणा केली.

भाजपात घमासान! माजी उपमुख्यमंत्र्यांची बंडखोरी; येदियुरप्पांच्या मुलाविरोधात ठोकला शड्डू

गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा सुरू होती. सुरुवातीला चित्रपटाचे नाव द इमॉर्टल अश्वत्थामा असं होतं. आदित्य धर हा चित्रपट दिग्दर्शित करणार होते. ज्यामध्ये विकी कौशल मुख्य भूमिका साकारणार होता. मात्र प्रोड्युसरने या चित्रपटातून अंग काढून घेतल्यानंतर हा चित्रपट होणार नसल्याचं घोषित करण्यात आलं होतं.

मात्र आता शाहिद कपूर आणि वाशू भगनानी अश्वत्थामा : द सागा कंटिन्यूअस या नावाने हा चित्रपट घेऊन येणार आहे. वाशू भगनानी यांच्या प्रोडक्शन हाऊस पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. ज्यामध्ये शाहिद कपूर महाभारतातील अश्वत्थामाची भूमिका साकारणार आहे. शाहिदने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर देखील या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हा चित्रपट म्हणजे महाभारतातील अमर योद्धा अश्वत्थामाची गोष्ट आहे. ज्यामध्ये प्राचीन आणि आधुनिक असे दोन्हीही भाग दाखवून भूतकाळ आणि वर्तमान काळ एकत्र येणार आहेत.

Singham Again : सिंघम अगेनच्या शूटिंगसाठी रोहित- करीना कपूर पोहोचले वाईच्या 262 वर्षे जुन्या मंदिरात

नुकताच शाहिद कपूर आणि आणि क्रिती सेनॉनचा (Kriti Sanon) चित्रपट ‘तेरी बातों में ऐसा उल्झा जिया’हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊन गेला आहे. शाहिद कपूर चाहत्यांचा लाडका असून त्याचे रोमँटिक चित्रपट नेहमीच पसंत केले जातात. मात्र अलीकडच्या काळात हैदर, उडता पंजाब आणि पद्मावत यांसारख्या चित्रपटातून त्यांनी ही प्रतिमा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. त्याने 2024 वर्षाची सुरुवात केवळ रोमँटिक चित्रपटाने केली. मात्र त्याची रोमँटिक शैली चाहत्यांना पसंत पडत नसल्याचे दिसून आलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube