Satish Kaushik Death : …म्हणून वयाच्या 56 व्या वर्षी सतीश कौशिक झाले होते दुसऱ्यांदा पिता
मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik Passes Away)यांचं निधन झालं आहे. सतीश कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं (Heart Attack)त्यांचा मृत्यू झाला आहे. कौशिक यांच्या निधनानं संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सतीश कौशिक यांचा मृतदेह सध्या गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयात ठेवला आहे. शवविच्छेदनानंतर आज दुपारी त्यांचं पार्थिव मुंबईमधील त्यांच्या घरी नेलं जाणार आहे. त्यानंतर येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या परिवार दुःखात बुडाला आहे. सतीश कौशिक यांच्यानंतर त्यांच्या परिवारामध्ये पत्नी शशी कौशिक आणि मुलगी वंशिका आहेत. 1985 मध्ये त्यांनी शशी कौशिक यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुलं होते. पण त्यांचा मुलगा शानुचं 1996 ला निधन झालं. त्यानंतर कौशिक यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. अनेक वर्ष कौशिक यांच्या घरामध्ये मुलांचा किलकिलाट नव्हता.
त्यानंतर 2012 मध्ये त्यांना सरोगसीतून वंशिका मुलगी झाली. यावेळी सतीश कौशिक यांचं वय 56 वर्ष एवढं होत. पण त्यांना ही मुलगी सरोगसीच्या माध्यमातून झाली होती. तर आता पुन्हा त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांच्या परिवार दुःखात बुडाला आहे.
Satish Kaushik Death : …म्हणून सतीश कौशिक यांनी ‘मिस्टर इंडिया’ साठी आमिरला नाकारलं होतं
सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 ला हरियाणातील महेंद्रगड येथे झाला होता. अनेक वर्ष ते दिल्लीमध्ये देखील राहत होते. 1972 ला त्यांनी कीरोडीमल कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पुर्ण केलं. त्यानंतर नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा आणि एफटीआयआयमध्ये त्यांनी अभिनयाचं शिक्षण घेतलं. 1983 साली त्यांचं जाने भी दो यारो या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण झालं होतं.