Tandel : अथांग स्टुडिओजची चित्रपटसृष्टीत दमदार एण्ट्री ; ‘तांडेल‌’ चित्रपटाचा थरारक टीझर प्रदर्शित

Tandel : अथांग स्टुडिओज निर्मित तांडेल या आगामी मराठी चित्रपटाची आज अधिकृत घोषणा करण्यात आली. या चित्रपटात दिग्गज अभिनेते सयाजी शिंदे

  • shakir sayyad
  • Written By: Published:
Tandel

Tandel : अथांग स्टुडिओज निर्मित तांडेल या आगामी मराठी चित्रपटाची आज अधिकृत घोषणा करण्यात आली. या चित्रपटात दिग्गज अभिनेते सयाजी शिंदे आणि आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता ओम भुतकर प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. आज प्रदर्शित झालेल्या टायटल टीझरमधून चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली असून, 2027 मध्ये हा चित्रपट चित्रपटगृहांत दाखल होणार आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीत वेगळ्या आणि आशयपूर्ण कथा सादर करण्याच्या उद्देशाने ‌‘अथांग स्टुडिओज‌’ या नव्या चित्रपट निर्मिती संस्थेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या निमित्ताने स्टुडिओच्या ‌‘तांडेल‌’ या पहिल्या मराठी चित्रपटाचा टायटल टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमधून चित्रपटाच्या विषयाची प्रभावी ओळख करून देण्यात आली आहे.

तांडेल चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन संदिप पांडुरंग माने यांचे आहे, तर पटकथा आणि संवाद किरण यज्ञोपवित यांनी लिहिले आहेत. ही एका पारंपरिक मच्छिमाराची गोष्ट असून यामध्ये माणसाचे समुद्राशी असलेले अतूट नाते प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

याबद्दल बोलताना दिग्दर्शक संदिप पांडुरंग माने म्हणाले, “तांडेल‌’ ही आमची पहिली कलाकृती म्हणजे केवळ पारंपरिक मासेमारीची कथा नाही, तर आधुनिकीकरणाच्या वेगात  अस्तित्त्व जपू पाहणाऱ्या माणसांच्या जगण्याची ही गोष्ट आहे. गेली बारा वर्ष आम्ही जपलेले सिनेमाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याच्या प्रवासातला ‌‘तांडेल‌’ हा महत्त्वाचा टप्पा आहे. सयाजी शिंदे आणि ओम भुतकर यांच्यासारखे ताकदीचे कलाकार या कथेला एक वेगळीच उंची देतील.”

अथांग स्टुडिओजच्या माध्यमातून निर्मात्या अमृता संदिप माने यांनी एका आशयघन आणि भव्य विषयाची निवड करत मराठी चित्रपटसृष्टीत दर्जेदार कलाकृती आणण्याचा निर्धार केला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची निर्मिती प्रक्रिया आणि नियोजनाची धुरा कार्यकारी निर्माता दत्तसंग्राम वासमकर यांनी अत्यंत समर्थपणे सांभाळली आहे. तर समुद्राची अथांगता आणि त्यातील संघर्षाचा थरार छायाचित्रकार अभिमन्यु डांगे यांनी आपल्या कॅमेऱ्यातून अत्यंत प्रभावीपणे टिपला आहे.

डिलिमेटेशनवरून आघाडीत नाराजी? लंके म्हणाले, चुकीच्या पोस्ट करू नका…

दोन्ही प्रमुख कलाकारांचे चित्रपटातील लुक तसेच चित्रपटातील इतर कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे ‌‘तांडेल‌’ या चित्रपटाबद्दल सिनेरसिकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

follow us