यशराज फिल्म्स अन् पोशम पा पिक्चर्सच्या पहिल्याच चित्रपटात आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत, समीर सक्सेना करणार दिग्दर्शन
Ayushmann Khurrana playing lead role in Yash Raj Films : बॉलीवूडचा गुणी अभिनेता आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) यशराज फिल्म्स आणि पोषम पा पिक्चर्सच्या बहुचर्चित क्रिएटिव भागीदारीतील पहिल्या मोठ्या चित्रपटात (Yash Raj Films) मुख्य भूमिका साकारणार आहे. आजच्या प्रेक्षकांसाठी एक नवा, डोळे दिपवणारा आणि थरारक अनुभव देण्याचा या सहकार्याचा मानस आहे. समीर सक्सेना या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.
छगन भुजबळांना लवकरच मिळणार मोठं पद; भाजप नेत्याचा मोठा दावा
गेल्या आठवड्यात, भारतातील आघाडीची मीडिया कंपनी यशराज फिल्म्सने (Bollywood News) पोशम पा पिक्चर्ससोबत (Posham Pa Pictures) क्रिएटिव पार्टनरशिपची घोषणा केली. पोषम पा पिक्चर्सला भारतीय मनोरंजन क्षेत्रातील सर्वात नाविन्यपूर्ण निर्मितीसंस्थांपैकी एक मानले जाते. ही भागीदारी 2025 पासून थिएट्रिकल चित्रपटांची निर्मिती करणार आहे.
जिंदाल कंपनीतील वायुगळतीमुळे बाधित विद्यार्थ्यांना पुन्हा त्रास, १९ जण रुग्णालयात दाखल
यशराज फिल्म्सचे CEO अक्षय विधानी यांचा हा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. स्टुडिओ मॉडेल विकसित करण्याच्या दृष्टीने ते एक नवीन निर्मिती व्यवसाय मॉडेल तयार करत आहेत. अक्षय यांचा हा दुसरा चित्रपट निर्मिती प्रकल्प असेल. याआधी त्यांनी मोहित सूरी यांच्या ‘आहान पांडे’ आणि ‘अनीत पड्डा’ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या चित्रपटाची निर्मिती केली होती.
एका वरिष्ठ व्यापार स्रोताने सांगितले, “या अजून नाव न ठेवलेल्या चित्रपटाचा फॉरमॅट पारंपरिक चित्रपटांपेक्षा वेगळा असेल. प्रेक्षकांना एक अनोखा व्हिज्युअल अनुभव मिळेल. आयुष्मान खुराना, ज्यांनी कंटेंट इनोवेशनला आपली ओळख बनवली आहे, या प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत. हा चित्रपट सुरुवातीपासून प्रेक्षकांना त्यांच्या जागेवर खिळवून ठेवण्याचे वचन देतो.
पोशम पा पिक्चर्सचे भागीदार—समीर सक्सेना, अमित गोलानी, बिस्वपति सरकार आणि सौरभ खन्ना—यांनी स्वतंत्रपणे आणि एकत्रितपणे अनेक प्रशंसनीय प्रोजेक्ट्स तयार केले आहेत, ज्यात ‘काला पानी’ आणि ‘मामला लीगल है’ यांचा समावेश आहे.