Sonu Nigam : ‘बच गया, नही तो मर जाता’, सोनू निगमने सांगितली धक्काबुक्कीची घटना

Sonu Nigam : ‘बच गया, नही तो मर जाता’, सोनू निगमने सांगितली धक्काबुक्कीची घटना

मुंबई : प्रसिद्ध गायक सोनू निगमला धक्का-बुक्की झाल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील चेंबूर फेस्टिवल या लाईव शो दरम्यान ही धक्का-बुक्की करण्यात आली आहे. या धक्का-बुक्कीचा व्हिडीओ सध्या सोशन मिडीयावर व्हायरल होत आहे. या धक्का-बुक्कीनंतर सोनू निगमला जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये त्याच्या टीम मधील एक जम जखमी झाला आहे.

या धक्काबुक्कीनंतर सोनू निगमने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सोनू निगम म्हणाला, ‘मी परफॉर्मन्समनंतर स्टेजवरून खाली येत असताना चाहत्यांनी सेल्फीसाठी गर्दी केली. यावेळी आमदार प्रकाश फातर्फेकर यांचा मुलगा स्वप्नीलने मला पकडलं. त्याचं नाव मला नंतर कळालं. मला वाचवायला हरिप्रकाश आले. त्याने हरीला धक्का दिला.’

Sonu Nigam : ठाकरे गटाच्या आमदाराच्या मुलाकडून सोनू निगमला धक्का-बुक्की ? व्हिडीओ व्हायरल

‘त्यानंतर मला धक्का दिला. त्यामुळे मीही पडलो. व्हिडीओत मीही स्टेजवर खाली पडताना दिसत आहे. बाजूला असतो, तर मी स्टेजच्या खाली पडलो असतो. त्यावेळी मला वाचवण्यासाठी रब्बानी आले. रब्बानींना तर त्याने जोरात धक्का दिला आणि ते मागे आदळले. वाचले, नाहीतर जीवच गेला असता. त्यांच्या मागे लोखंड असतं, तर त्यांचा मृत्यू झाला असता.’

दरम्यान असं सांगितलं जात आहे की, आमदार प्रकाश फातर्फेकर यांच्याकडून या चेंबूर फेस्टिवल आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांचा मुलगा स्वप्नीलने सोनूची मॅनेजर सायराशी उद्धटपणे वागला होता. त्यानंतर सोनू निगम स्टेजवरून खाली उतरत असताना त्याने सोनूच्या बॉडीगार्ड्ला धक्काबुक्की केली आणि त्यानंतर सोनूलाही धक्काबुक्की केली. त्यात सोनूचा मुलगाही खाली कोसळल्याचं सांगण्यात येत आहे.

त्यानंतर सोनू निगमने थेट चेंबूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तर आता या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू झाला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सोमवारी रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. या धक्का-बुक्की करणाऱ्यांची अद्याप ओळख पटली नसल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube