‘मराठी माणूस पंतप्रधान व्हावा ही बाळासाहेबांची इच्छा होती’, Sandip Pathak चे ट्विट चर्चेत
मराठी अभिनेता संदीप पाठक ( Sandip Pathak ) हा कायम सोशल मीडियावर सक्रीय असतो. आपल्या प्रवासामधील वेगवेगळ्या घटनांचे व्हिडीओ संदीप कायम पोस्ट करत असतो. याचबरोबर तो सामाजिक व राजकीय प्रश्नांवर देखील भाष्य करत असतो. आज त्याने एक ट्विट केले आहे. त्याने केलेल्या या ट्विटची सर्वत्र चर्चा होते आहे. मराठी माणूस पंतप्रधान व्हावा अशी बाळासाहेब ठाकरेंची (Balasaheb Thackeray ) इच्छा होती, असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
(Marathi Movie : ‘घर बंदूक बिरयानी’मधील गाणं तेलुगू, तामिळमध्ये प्रदर्शित)
सध्या महाराष्ट्रामध्ये कसबा व पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. त्यातच काल केंद्र सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे संदीपच्या या ट्विटची चर्चा होते आहे. संदीपने आपल्या ट्विटमध्ये मराठी माणुस पंतप्रधान व्हायला पाहिजे, अशी मा. बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. मग तो कोणत्याही पक्षाचा असो, असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यावेळी त्याने भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे या पक्षांना टॅग केले आहे.
दरम्यान त्याने केलेल्या या ट्विटवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांचे नाव पोस्ट केले आहे. तर काहींनी सुप्रिया सुळे पंतप्रधान होऊ शकतात, असे म्हटले आहे. संदीपचे सध्या वऱ्हाटे निघालयं लंडनला हे एकपात्री नाटक रंगभूमीवर जोरदार सुरु आहे. अगदी परदेशामध्ये देखील त्याने या नाटकाचे प्रयोग केले आहेत.
मा. बाळासाहेब ठाकरें ची इच्छा होती की “मराठी माणूस” पंतप्रधान झाला पाहिजे, मग तो कोणत्याही पक्षाचा असेल.
पण सध्याची परिस्थिती लक्षात घेता आपला माणूस पंतप्रधान होईल?? जरा कठीण वाटतंय… @BJP4Maharashtra @NCPspeaks @ShivSenaUBT_ @mnsadhikrut @INCIndia @AAPMumbai— Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक (@mesandeeppathak) February 24, 2023