Balgandharva Movie: ‘बालगंधर्व’ला 12 वर्षे पूर्ण; या खास दिवशी रवी जाधवांची मोठी घोषणा

Balgandharva Movie: ‘बालगंधर्व’ला 12 वर्षे पूर्ण; या खास दिवशी रवी जाधवांची मोठी घोषणा

Balgandharva Movie: आपल्या सिनेसृष्टीला अनेक दिग्गज कलाकार लाभले. त्यातीलच एक म्हणजे बालगंधर्व होय. रवी जाधव (Ravi Jadhav) यांनी चित्रपटाच्या माध्यमातून बालगंधर्व यांच्या आयुष्यातील विविध पैलू पडद्यावर उलगडले आहेत. (Special Day) आज रवी जाधव दिग्दर्शित ‘बालगंधर्व’ (Balgandharva) या चित्रपटाला तब्बल १२ वर्षे पूर्ण झाली आहेत.


या चित्रपटात अभिनेता सुबोध भावेने (Actor Subodh Bhave) अप्रतिम भूमिका साकारत प्रेक्षकांवर आपली छाप पाडली आहे. या खास दिवसानिमित्त दिग्दर्शक रवी जाधव यांनी इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करत एक मोठी घोषणादेखील केली आहे. रवी जाधव यांनी लिहलंय, ”आज एक तप झाले “बालगंधर्व” हा माझा पहिला ‘बायोग्राफीकल’ चित्रपट प्रदर्शित होऊन जो आमच्या टिमच्या आणि प्रेक्षकांच्या सदैव स्मरणात राहील!!!”

तसेच त्यांनी पुढे लिहलय, ”उद्या तब्बल १२ वर्षांनी माझ्या दुसऱ्या ‘बायोग्राफीकल’ चित्रपट ‘मै अटल हूँ’ च्या चित्रीकरणाचा प्रारंभ होत आहे. असाच आशिर्वाद असावा!!!” बालगंधर्व हा इ.स. २०११ साली पडद्यावर झळकलेला, व नितिन चंद्रकांत देसाई याने निर्माण केलेला मराठी चित्रपट आहे.

‘The Kerala Story’ सिनेमाच्या ट्रेलरवर युट्यूबची मोठी कारवाई; अभिनेत्री, म्हणाली…

मराठी रंगभूमीवर इ.स.च्या २०व्या शतकात अतिशय लोकप्रिय ठरलेले गायक-अभिनेते नारायण श्रीपाद राजहंस, अर्थात बालगंधर्व यांच्या जीवनावर हा सिनेमा आधारलेला आहे. सुबोध भावे याने या चित्रपटात बालगंधर्वांची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. ६ मे २०११ रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube