Bawaal Trailer: अजय अन् निशाची भन्नाट लव्ह स्टोरी; ‘बवाल’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज बघाच

Bawaal Trailer: अजय अन् निशाची भन्नाट लव्ह स्टोरी; ‘बवाल’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज बघाच

Bawaal Trailer Out: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता वरुण धवन यांच्या आगामी ‘बवाल’ या सिनेमाची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. या सिनेमात एक भन्नाट लव्ह स्टोरी (Love story) चाहत्यांना बघायला मिळणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज (Trailer Out) करण्यात आला आहे. जान्हवी (Janhvi Kapoor) आणि वरुणच्या (Varun Dhawan) या प्रेमळ ‘बवाल’चा (Bawaal) संबंध दुसऱ्या महायुद्धाशी जोडला असल्याचे दिसून येत आहे.

या सिनेमाच्या कथेमध्ये हिटलरच्या पात्राचा तडकाही बघायला मिळणार आहे. परंतु हा सिनेमा कोणत्याही प्रकारे महायुद्धावर आधारित नसल्याचे सांगितले जात आहे, या सिनेमाची कथा ही हृदयाच्या युद्धावर आहे. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये जान्हवी कपूर आणि वरुण धवन यांच्या केमिस्ट्रीने सिनेमात आपली जादू दाखवली आहे.‘बवाल’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित होताच, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ‘बवाल’च्या ट्रेलरच्या सुरुवातीला वरुण धवन लखनौच्या रस्त्यांवर धमाकेदार स्टाईलने बाईक चालवत असल्याचे दिसून येत आहे.

तसेच या सिनेमाच्या पार्श्वभूमीत एक आवाज ऐकू येतो की, अज्जू म्हणजेच वरुण धवनने लोकांमध्ये आपली खोटी प्रतिमा बनवल्याचे दिसून आली आहे. त्यानंतर या सिनेमात महायुद्धाचा चांगलाच तडका लावला आहे. या सिनेमाच्या कथेत ट्विस्ट येतो, जेव्हा अज्जू लग्न करून युरोपला पोहोचतो. तिथून प्रेम, भांडण आणि मनातील युद्ध पाहायला मिळणार आहे. जान्हवी कपूर आणि वरुण धवन यांचा ‘बवाल’ हा सिनेमा एका मध्यमवर्गीय इतिहास शिक्षक अजित दीक्षित उर्फ अज्जूची यांची कथा सांगणारा हा सिनेमा आहे. अज्जू आपल्या शहरातील लोकांमध्ये खोट्या कथा सांगून स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण करून फिरत असतो.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

परंतु केवळ या खोट्या प्रतिमेमुळे तो एका सुंदर मुलीशी लग्न केल्याचे दिसून आला आहे. स्वतःच्या या सगळ्या खेळामध्ये तो स्वतःचं अडकतो. आणि त्या दरम्यानच अज्जू आपल्या बायकोला घेऊन युरोपला निघून जातो. युरोपला गेल्यावर अज्जूला असे समजते की, आपल्या बायकोला एक समस्या आहे. तिच्या या आजाराविषयी जगाला कळले, तर आपल्या प्रतिमेचे काय होणार? याची त्याला काळजी वाटू लागते. हा सिनेमा पूर्णपणे दोन लोकांच्या नात्याभोवती फिरत असल्याचे दिसत आहे. साजिद नाडियादवालाचा सिनेमा ‘बवाल’ २१ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओवर रिलीज करण्यात येणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube