‘स्वप्नसुंदरी’साठी भूषण प्रधानचा शोध सुरु !’शोधू कुठे नवरी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Swapn Sundari चित्रपटातील ‘शोधू कुठे नवरी?’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे गाणं गायक कुणाल गांजावाला यांनी गायलं आहे.

Swapn Sundari

Bhushan Pradhan’s search for his ‘Swapn Sundari’ song ‘Shodhu Kuthe Navri’ has released : काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘स्वप्नसुंदरी’च्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली होती. चित्रपटाच्या शीर्षकावरून आणि टीझरची झलक पाहाता भूषण प्रधान आपल्या ‘स्वप्नसुंदरी’च्या शोधात असल्याचे स्पष्ट झाले. आता या शोधाला संगीताची साथ लाभली असून चित्रपटातील ‘शोधू कुठे नवरी?’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. योग्य जोडीदाराच्या शोधातील गंमत, गोंधळ आणि त्यामागची स्वप्नं हलक्याफुलक्या अंदाजात मांडणारं हे गाणं आहे.

UBT Crises : 60 वर्षांत 6 बंड, उद्धव ठाकरेंच्या काळातच 4 मोठे धक्के; वाचा बंडाळीचा इतिहास

या गाण्याला लोकप्रिय गायक कुणाल गांजावाला यांच्या आवाजाची जादू लाभली आहे. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीने हिंदी, मराठी सिनेसृष्टीला अनेक सुपरहिट गाणी देणाऱ्या कुणाल गांजावाला यांनी या गाण्यातही वेगळी ऊर्जा आणली आहे. प्रशांत मडपुवार यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर अंकुश बोरडकर यांनी हे गाणं संगीतबद्ध केले आहे. हलकाफुलका अंदाज, आकर्षक शब्दरचना आणि गाण्यातील मजेशीर मांडणी यामुळे ‘शोधू कुठे नवरी?’ हे गाणे तरुणाईसह सर्व वयोगटातील प्रेक्षकांना भावत आहे.

FIFA World Cup रोनाल्डोला धक्का, काँगोच्या भक्कम बचावमुळे पोर्तुगाल- काँगो सामना ड्रॉ

दिग्दर्शक अक्षय जयसिंगराव शिंदे म्हणतात,“ ‘स्वप्नसुंदरी’ हा चित्रपट जसा एका स्वप्नातील व्यक्तीच्या शोधाची गोष्ट सांगतो, तसंच ‘शोधू कुठे नवरी?’ हे गाणं त्या शोधातील मजेशीर प्रवास उलगडतं. प्रत्येकाच्या मनात आपल्या जोडीदाराबद्दल काही ना काही कल्पना असतात आणि त्या भावना या गाण्यात अतिशय मनोरंजक पद्धतीने मांडल्या आहेत. कुणाल गांजावाला यांच्या आवाजामुळे गाण्याला एक वेगळीच उंची मिळाली आहे. प्रेक्षकांना हे गाणं नक्की आवडेल याची मला खात्री आहे.”

UBT MP Crises : पुण्यात गेले, भेट झाली नाही; ओमराजेंसाठी कैलास पाटील इतके अस्वस्थ का?

रेडबेल मीडिया आणि पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत, सतीश महादेव गेजगे निर्मित व अक्षय जयसिंगराव शिंदे दिग्दर्शित ‘स्वप्नसुंदरी’ हा लग्नसंस्था, नात्यांमधील गुंतागुंत आणि आपल्या स्वप्नातील जोडीदाराच्या शोधाची मनोरंजक कथा मांडणारा चित्रपट आहे. चित्रपटाचे कथा आणि पटकथा अक्षय जयसिंगराव शिंदे यांनीच केली असून दर्शना सतीश गेजगे आणि निलेश सुरेश अग्रवाल यांनी सहनिर्मात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. येत्या २४ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

follow us