Veena Jagtap : वीणा जगतापचं मोठ्या पडद्यावर पदार्पण; अभिनेत्री लवकरच झळकणार ‘या’ सिनेमात

Veena Jagtap : वीणा जगतापचं मोठ्या पडद्यावर पदार्पण; अभिनेत्री लवकरच झळकणार ‘या’ सिनेमात

Veena Jagtap: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वीणा जगताप (veena jagtap). उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणाऱ्या वीणाला बिग बॉस मराठीमुळे (Bigg Boss Marathi) खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या शोमुळे वीणाच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल आयुष्याचीही नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली होती. ‘बिग बॉस’ गाजवलेली मंडळी आता ‘दिल दोस्ती दिवानगी’ (Dil Dosti Diwanagi) करताना बघायला मिळत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirish Rane (@shirishvrane)


आपल्या दमदार अभिनयाने भूमिका लीलया साकारणारे अभिनेते विद्याधर जोशी, अभिनेत्री सुरेखा कुडची, वीणा जगताप आणि स्मिता गोंदकर लवकरच एका सिनेमात झळकणार आहेत. ‘दिल दोस्ती दिवानगी’ असे या सिनेमाचे नाव आहे. ‘दिल दोस्ती दिवानगी’ या सिनेमात मैत्री, प्रेम त्यानंतरचं आयुष्य यामध्ये अडकलेल्या प्रेमवीरांची कथा दाखवण्यात येणार आहे. या प्रेमकथेच्या प्रवासात प्रत्येक वळणावर घडणाऱ्या गोष्टी, याचा रंजक अनुभव देणारा हा सिनेमा आहे.

यामुळे चाहते यामध्ये चांगलच गुंतून जाणार असा विश्वास हे कलाकार व्यक्त करत आहेत. या सिनेमात विद्याधर जोशी मायकेल ब्रिगेन्झा, सुरेखा कुडची मिस मेरी या कॅथलिक व्यक्तिरेखा साकारत असताना बघायला मिळणार आहेत. तर स्मिता गोंदकर रिया आणि वीणा जगताप श्रिया हे ग्लॅमरस अंदाजात पात्र करत आहेत. या चौघांबरोबर कश्यप परुळेकर, चिराग पाटील, अतुल कवठळकर, तीर्था मुरबाडकर, तपन आचार्य, दुर्वा साळोखे, कंवलप्रीत सिंग, प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, स्मिता जयकर हे कलाकार ही सिनेमात बघायला मिळणार आहेत.

Jawan मधील व्हायरल डायलॉगनंतर समीर वानखेडेंनी किंग खानला दिलं उत्तर? म्हणाला…

तसेच ट्रान्स इंडिया मिडिया अँड एन्टरटेनमेन्टची प्रस्तुती असलेल्या ‘दिल दोस्ती दिवानगी’ सिनेमाची निर्मिती राजेंद्र राजन यांनी केली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शनाची धुरा शिरीष राणे यांनी सांभाळली आहे. हा सिनेमा ६ ऑक्टोबरला प्रदर्शित करण्यात येणार आहे.

‘दिल दोस्ती दिवानगी’ सिनेमाचे छायांकन धनंजय कुलकर्णी तर संकलन अमोल खानविलकर यांचे आहे. कथा, पटकथा, संवाद दीपक तारकर यांचे आहेत. अवधूत गुप्ते, वैशाली सामंत,सोनाली पटेल यांच्या आवाजामधील सिनेमातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहे. सोनाली उदय यांचे संगीत सिनेमाला लाभले आहे. कार्यकारी निर्माते अनुराधा बोरीचा, इ.सुरेश प्रभाकर आहेत. सहाय्यक दिग्दर्शक जुईली पारखी आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि राजेश बिडवे यांचे आहे तर कलादिग्दर्शक केशव ठाकूर हे आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube