‘बिग बॉस मराठी’च्या घरात ज्याची चर्चा, त्याचा नंबर वरचा; पण काय असणार फायनल ट्विस्ट?

‘बिग बॉस मराठी’च्या घरात ज्याची चर्चा, त्याचा नंबर वरचा; पण काय असणार फायनल ट्विस्ट?

Bigg Boss Marathi New Season Day 11 : ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi) घरातील सदस्य आता खऱ्या अर्थाने आपला कमाल खेळ खेळू लागले आहेत. (Bigg Boss Marathi New Season) घरातील प्रत्येक सदस्य सध्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. पण आता’बिग बॉस मराठी’च्या घरात ज्याची चर्चा आहे, त्याचा नंबर वरचा आहे. ‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमाचा नवा सीझन सुरू होऊन दहा दिवस पूर्ण झाले असून दहाही दिवस प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन सुरू आहे. क्षणाक्षणात नवा ट्विस्ट येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


‘बिग बॉस मराठी’च्या घरात कधी काय ट्विस्ट येईल हे कोणी सांगू शकत नाही. आता टास्कदरम्यान घरातील सदस्य धडपड करताना दिसत आहेत. ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो (Bigg Boss Marathi New Promo) समोर आला आहे. प्रोमोमध्ये अंकिता बिग बॉसने दिलेला आदेश वाचत म्हणतेय,”या घरात ज्याची चर्चा आहे, त्याचा नंबर वरचा आहे. आपणा सर्वांना चर्चेत नसणाऱ्या जोड्यांना नॉमिनेट करायचं आहे. त्यानंतर घरातील सदस्य पॅडी, सूरज, योगिता, निक्की, घन:श्याम ही नावे घेताना दिसून येत आहेत. तर वर्षा ताई म्हणत आहेत,”माझ्या निर्णयाशी मी ठाम आहे”. त्यानंतर अंकिता पुढे म्हणते, “परंतु इथेच येतो माझा आवडता ट्विस्ट”.

आता ‘बिग बॉस’ काय ट्विस्ट आणणार हे जाणून घेण्याची ‘बिग बॉस’प्रेमींना उत्सुकता लागली आहे. एकंदरीत आजचा भाग खूपच उत्साहवर्धक आणि मनोरंजक असणार आहे. ‘बिग बॉस मराठी’मध्ये कोणते सदस्य सर्वाधिक चर्चेत आहेत हे प्रेक्षकांना माहिती आहे. पण घरातील सदस्यांना कोण सर्वाधिक चर्चेत वाटतं हे आजच्या भागात समजणार आहे.

Bigg Boss Marathi: बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण पडलाय परदेसी गर्ल इरिनाच्या प्रेमात?

बिग बॉसच्या घरात घन:श्यामने म्हणजेच छोट्या नेणे आपल्या हजरजबाबीपणाने लोकांची मने जिंकली आहेत. घन:श्याम सध्या अरबाज, निक्की, वैभव, जान्हवी यांच्या ग्रुपमध्ये वावरत आहे. पहिल्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये घरात जोरदार वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यानंतर आता अंकिता वालावलकर ‘बिग बॉस मराठी’च्या घरात आता कॅप्टन म्हणून वावरणार आहे. दिलेल्या जबाबदाऱ्या ती कशी पूर्ण करणार? कामे वाटताना घरातील सर्व सदस्यांना समान न्याय देईल का? तिला घरातील लोक साथ देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube