Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरावर आलंय मोठं संकट; “तो आलाय…”

Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरावर आलंय मोठं संकट; “तो आलाय…”

Bigg Boss Marathi New Season Day 30 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून काल इरिना रूडाकोवा बाहेर पडली. (Bigg Boss Marathi New Season) गेले चार आठवडे सर्वच सदस्यांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. (Bigg Boss Marathi) बघता बघता या नव्या सीझनचा आता पाचवा आठवडा सुरू झाला आहे. (Bigg Boss Marathi New Promo) या आठवड्यात मात्र घरातील सदस्यांची झोप उडणार आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश (Ritesh Deshmukh) म्हटल्याप्रमाणे हा आठवडा खूप खास असणार आहे. सदस्यांची उडालेली झोप पाहताना प्रेक्षकांना मात्र मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)


‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो घाबरवणारा आहे. या नव्या प्रोमोमध्ये बिग बॉसने सांगितले आहे की, “सावधान… या घरावर आलंय एक मोठं संकट… तो आलाय.. मानकाप्या…”. या नव्या प्रोमोमध्ये घरातील सर्व सदस्यांची झोप उडालेली असून ते चांगलेच घाबरलेले असल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच घरात एका आरश्यावर लिहिलेलं आहे की, “एकटं फिरू नका…नाहीतर..मानकाप्या”.

बिग बॉस मराठीच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊने जान्हवीला मोठी शिक्षा सुनावली आहे. आता आजपासून घरातील सर्वच सदस्य डेंजर झोनमध्ये असणार आहेत. आता यातून घरातील सदस्य आपला कसा मार्ग काढणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. आपल्या खेळीने इतरांना घाबरवणारे सदस्य आता स्वत:चं भित्रे झाल्याचे दिसत आहे.

‘परदेसी गर्ल’चा प्रवास संपला

‘बिग बॉस मराठी’च्या घरात इरिनाने आंतरराष्ट्रीय स्टाईलने कल्ला करण्यासोबत मराठीचे धडे गिरवले. इरिनाची मराठी भाषा शिकण्याची धडपड, तिचा मराठी भाषेतला गोडवा ‘बिग बॉस’ प्रेमींच्या चांगलाच पसंतीस उतरला. एकादशीचा उपवास, पुरणपोळी बनवणं उखाणा घेणं, मराठी गाण्यांवर डान्स करणं अशा अनेक गोष्टींमुळे इरिनाने भारतीयांच्या मनात आपली विशेष जागा निर्माण केली. भारतीय नसलेली इरिना इथल्या संस्कृतीशी स्वत:ला जोडून घेताना दिसून आली. इरिनाचे मराठी उच्चार स्पष्ट नसले तरी तिचं बोलणं ऐकणं प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा विषय झाला होता.

Bigg Boss Marathi: ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील ‘परदेसी गर्ल’चा प्रवास संपला; इरिना रूडाकोवा पडली बाहेर

सीझनमधील टॉप 3 सदस्य

‘बिग बॉस मराठी’च्या घराचा निरोप घेतल्यानंतर इरिना म्हणाली,”बिग बॉस मराठी’च्या घराची आता 100 टक्के मला आठवण येणार आहे. या घरातून बाहेर पाऊल टाकल्यापासूनच मी घराला मीस करू लागले आहे. घरातील लोक मला समजून घेण्यास कमी पडले असं मला वाटत नाही. सर्वच सदस्यांसोबत मी जोडले गेले होते. मला मराठी भाषा चांगली येत असती तर कदाचीत मी हा खेळ आणखी उत्तम खेळू शकले असते. मला वाटतं ‘बिग बॉस मराठी’च्या या सीझनमधील टॉप 3 सदस्य माझ्या मते वैभव, अरबाज आणि डीपी दादा हे आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube