‘Bigg Boss OTT 3’चा बीटीएस व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला; अनिल कपूरचा लुक कसा वाटला?
Bigg Boss OTT 3 Release Date: टीव्हीनंतर, ओटीटीचा (OTT) सर्वात वादग्रस्त रिॲलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी 3’ (Bigg Boss OTT 3) सध्या चर्चेत आहे. त्याचा हंगाम ओटीटीला धडकण्यासाठी सज्ज झाला आहे. यावेळी शोमध्ये अनेक नवीन आणि मनोरंजक गोष्टी पाहायला मिळणार आहेत. यावेळी शोची सर्वात खास गोष्ट म्हणजे बिग बॉस ओटीटी 3 सलमान खान नसून अनिल कपूर (Anil Kapoor) होस्ट करणार आहे. चला तर मग यावेळी तुम्ही शो कधी, कुठे आणि कोणत्या वेळी पाहू शकणार आहात जाणून घेऊया…
View this post on Instagram
बिग बॉस ओटीटी 3 कधी रिलीज होईल?
बिग बॉस ओटीटी 3 च्या प्रीमियरची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यावेळी सलमान खानऐवजी अनिल कपूर शो होस्ट करताना दिसणार आहे. यावेळी 21 जूनपासून हा रिॲलिटी शो सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी निर्मात्यांनी अनिल कपूरच्या होस्टिंगशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानंतर शोमध्ये सलमान खान न दिसल्याने चाहते थोडे निराश दिसले.
तुम्ही कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर शो पाहणार ?
बिग बॉसचा प्रीमियर जिओ सिनेमावर होणार आहे. याआधी बिग बॉस ओटीटीचे दोन्ही सीझन फक्त जिओ सिनेमावर पाहिले गेले होते. आधीचे दोन्ही शो ओटीटीवर विनामूल्य पाहण्यात आले होते, परंतु यावेळी दर्शकांना बिग बॉस ओटीटी 3 जिओ प्रीमियमवर पाहावे लागणार आहे.
बिग बॉस ओटीटी3 ची वेळ काय असेल?
तुम्ही जिओ सिनेमावर बिग बॉस ओटीटी 3चे 24 तास स्ट्रीमिंग पाहू शकणार आहे. यावेळी अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी या शोमध्ये दाखल होणार आहेत. या सीझनमध्ये येणाऱ्या स्पर्धकांचीही माहिती समोर येत आहे. पण यावेळी किती कलाकार आणि युट्युबर्स असतील हे काही दिवसातच समोर येईल.
हे स्पर्धक शोचा एक भाग बनू शकतात
शिवांगी जोशी, शफाक नाज, नुपूर सनॉन, अदनान शेख, अनुषा दांडेकर आदी शोमध्ये येणार असल्याची चर्चा आहे.’बिग बॉस ओटीटी’चा पहिला सीझन 2021 मध्ये रिलीज झाला होता. दिव्या अग्रवाल हिने बाजी मारली. दुसऱ्या सीझनचा विजेता एल्विश यादव ठरला होता.