नेहा राठोडच्या ‘बिहार में का बा?’ या नव्या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

नेहा राठोडच्या ‘बिहार में का बा?’ या नव्या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

bihar mein ka ba neha singh rathod : ‘यूपी में का बा?’ हे गाणं गायलेली गायिका नेहा सिंह राठोडने (neha singh rathod) गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social media) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत असलयाचे दिसून येत आहे. शिवाय तिने सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्यामुळे विरोधकांनी तर तिच्या अनेक गाण्याचे कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणत ठेवले होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी देखील तिच्या गाण्याची दखल घेतली होती.

यामुळे नेहा सिंह राठोडची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जोरदार चर्चा सुरु आहे. आता नेहा सिंह राठोडने आपल्या गाण्यातून बिहार सरकारला (Bihar Govt) चांगलेच धारेवर धरले आहे. कारण ‘बिहार में का बा’ (bihar mein ka ba) या गाण्याचा दुसरा भाग तिने प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये तिने नितीश कुमार सरकारला काही सवाल केले आहेत. या गाण्यातून तिने बिहारमधील गुन्हेगारी, रामनवमीला झालेला हिंसाचार आणि राज्यामध्ये बेरोजगाराविषयी तिने नितीश कुमार आणि तेजस्वी यादव याना दोघांना धारेवर धरले आहे.

हे गाणं तिने तिच्या भोजपुरी स्टाईलमध्ये गायले आहे. बिहारमध्ये रामनवमीच्या दरम्यान झालेल्या हिंसाचारावरून विरोधकांनी नितीश कुमार यांच्या सरकारवर खोचक टीका करायला सुरुवात केली आहे. अशातच नेहाने सरकारला आपल्या गाण्यातून काही सवाल करण्यात आले आहेत. यामुळे हे गाणं आता राजकीय वादाचा मुद्दा ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

Celina Jaitly: ‘मी घर जावई व्हायला तयार, माझ्याशी लग्न कर’..तर अभिनेत्रीनं दिलं ‘रोमँटिक’ उत्तर

नेहाने तिच्या गाण्यामध्ये नेमकं काय म्हटलं आहे हे ऐकण्यासाठी तुम्ही हा व्हिडीओ एकदा बघाच. नेहाने तिच्या गाण्यामध्ये बिहारमधील नालंदा आणि सासाराम येथील हिंसाचाराचा उल्लेख करण्यात आले आहे. रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये दगडफेक सुरू असताना, काका- पुतणे गिरणीत दळत होते का? बिहारमध्ये हुकूमशाही येण्याची चाहूल लागली आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, तिने गाण्यातून १० लाख बेरोजगारांना नोकऱ्या देण्याचा आश्वासनाची आठवण बिहार सरकारला करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. यावर नेटकऱ्यांनी कॉमेंट्स करण्यास सुरुवात केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube