Saif Ali Khan: सैफ अली खान रुग्णालयात दाखल! नेमकं कारण काय? चाहत्यांना धक्का
Saif Ali Khan Admitted: बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सैफ (Saif Ali Khan ) अली खानबाबत (Saif Ali Khan) एक मोठी बातमी समोर येत आहे. 22 जानेवारीला सकाळी अभिनेत्याला कोकिलाबेन रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. अहवालात दावा केला जात आहे की अभिनेत्याच्या गुडघा आणि खांद्याला फ्रॅक्चर झाले आहे.
यानंतर सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. सैफसोबत त्याची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान देखील रुग्णालयात आहे. मात्र, दुखापतीचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. अभिनेत्याच्या कुटुंबीयांकडूनही याबाबत कोणतेही अपडेट समोर आली नाही. सैफ अली खानशी संबंधित ही बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आह.
सैफसोबत करीना कपूरही हॉस्पिटलमध्ये उपस्थित: सैफ अली खानला सकाळी 8 वाजता कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. एखाद्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सैफला ही दुखापत झाली असावी, असा दावा केला जात आहे. अभिनेत्याच्या गुडघ्यात आणि खांद्याला फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे.
Ram Mandir: राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याविषयी व्यक्त होताना गायक सोनू निगम झाला भावुक
डॉक्टरांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यास सांगितले: 2016 मध्ये ‘रंगून’ चित्रपटाच्या सेटवर सैफ अली खान गंभीर जखमी झाला होता. त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यानंतर त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापूर्वी ‘क्या कहना’ चित्रपटाच्या सेटवरही अभिनेता जखमी झाला होता. या कालावधीत 100 टाके घालावे लागले होते. संपूर्ण टीम खंडाळ्यात स्टंट सीन्स शूट करत होती. त्या दिवसात पावसामुळे चिखल होता, त्यामुळे सैफने मोटारसायकल भरधाव वेगाने चालवली तेव्हा ती चिखलात घसरली. या घटनेनंतर अभिनेत्याला सावरायला अनेक महिने लागले.
या चित्रपटांमध्ये कलाकार दिसणार आहेत: सैफ अली खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या अभिनेता ‘देवरा’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी कपूर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटातून जान्हवी साऊथमध्ये पदार्पण करणार आहे.