अभिनेता धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज, प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्वाची अपडेट
Dharmendra Health Updates : बॉलिवूड सुपरस्टार धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल एक मोठी अपडेट ब्रीच कॅडी रुग्णालयातून देण्यात आली आहे.
Dharmendra Health Updates : बॉलिवूड सुपरस्टार धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबद्दल एक मोठी अपडेट ब्रीच कॅडी रुग्णालयातून देण्यात आली आहे. गेल्याकाही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले आहे. अभिनेता धर्मेंद्र यांना उपचारासाठी 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील ब्रीच कॅडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालवली असल्याची माहिती समोर आली होती. तसेच त्यांच्या निधनाचे खोट्या बातम्या देखील पसरवण्यात आले होते मात्र धर्मेंद्र उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती देओल कुटुंबीयांनी दिली होती.
तर आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले असून त्यांना घरी नेण्यात आलं आहे. रुग्णालयातून त्यांना अॅम्बूलन्समधून घरी नेण्यात आलयं. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा बॉबी देओल देखील होता. तर दुसरीकडे धर्मेंद्र (Dharmendra) यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतीक समदानी यांनी धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत एक मोठी अपडेट दिली आहे.
धर्मेंद्र यांच्यावर बऱ्याच काळापासून माझ्याकडून उपचार सुरु आहे. त्यांना आता रुग्णालयातून (Breach Candy Hospital) डिस्चार्ज देण्यात आला आहे पण इथून पुढचे उपचार आता त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याची माहिती डॉ. प्रतीक समदानी यांनी दिली.
अचानक तब्येत बिघडल्याने धर्मेंद्र यांनी मुंबईतील ब्रीच कॅडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तर गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती नाजूक होती मात्र धर्मेंद्र उपचारांना प्रतिसाद देत असल्याची माहिती देओल कुटुंबीयांकडून देण्यात आली होती. तर आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून त्यांच्यावर पुढील उपचार त्यांच्या राहत्या घरी होणार आहे. बॉलिवूड (Bollywood) सुपरस्टार सलमान खान, शाहारुख खान, गोविंदा रितेश देशमुख यांच्यासह अनेक सुपरस्टार यांनी धर्मेंद रुग्णालयात दाखल असताना त्यांची भेट घेतली होती.
IMD Alert : पुढील दोन दिवस सावध, राज्यात पाऊस अन् थंडीची लाट, अलर्ट जारी
