Johnny Depp: आयुष्यातून उद्ध्वस्त झालेल्या अभिनेत्याचे दमदार कमबॅक : थेट कान्समध्ये 7 मिनिटांचे स्टॅन्डिग ओवेशन
Johnny Depp: कान्स फिल्म फेस्टिव्हल (Cannes Film Festival) सुरू झाला आहे. हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपचा कमबॅक चित्रपट ‘जीन डू बॅरी’ (Jean du Barry) या महोत्सवात प्रदर्शित झाला आहे. या खास प्रसंगी अभिनेत्याचे सात मिनिटे उभे राहून स्वागत केले आहे. त्याच्याबद्दलचे हे प्रेम आणि आदर पाहून जॉनी डेप हा भावूक झाला आहे.
Johnny Depp tears up as #Cannes2023 showers him with a seven-minute standing ovation at the premiere of ‘Jeanne du Barry.’ pic.twitter.com/RsZjtao8O7
— Ramin Setoodeh (@RaminSetoodeh) May 16, 2023
त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social media) जोरदार व्हायरल होत आहे. जॉनी डेपने त्याच्या आयुष्यात खूप चढ-उतार सोसले आहेत. गेल्या काही वर्षे त्याच्यासाठी खूप कठीण काळ होता. अभिनेत्याची पत्नी अंबर हर्ड (Amber Heard) हिने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर डेपने त्याच्या पत्नीवर 50 दशलक्ष मानहानीचा दावाही केला.
हा मानहानीचा खटला जॉनी डेपने अंबरविरुद्ध जिंकला होता. जॉनीने आता त्याच्या व्यावसायिक आयुष्यात दमदार पुनरागमन केले आहे. जॉनी डेपने ‘जीन डू बॅरी’द्वारे पुनरागमन केले आहे. 2023 च्या कान फेस्टिव्हलमध्ये हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. या खास प्रसंगी अभिनेत्याला स्टँडिंग ओव्हेशन मिळाले आहे.
Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष
संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले होते. जॉनी डेपच्या या चित्रपटावर सगळेच खुश दिसत होते. आनंद आणि सन्मानाच्या विशेष प्रसंगी जॉनी डेपचे डोळे आनंदाश्रूंनी ओघळले होते. अभिनेत्याच्या एका चाहत्याने त्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तो या भव्य महोत्सवात दिसला तेव्हा ‘जीन डू बॅरी’च्या उद्घाटनाच्या वेळी त्याचे सात मिनिटे उभे राहून स्वागत करण्यात आले. तसेच ‘जीन डू बॅरी’ हा एक ऐतिहासिक ड्रामा सिनेमा आहे.