खळखळून हसवणारा ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, कोण करणार सूत्रसंचालन?

Chala Hawa Yeu Dya : सध्या झी मराठी वाहिनीवर चला हवा येऊ द्या’चे प्रोमो चांगलेच चर्चेत आहेत. त्यावरून चर्चा सुरू आहे की, हे पुन्हा येत आहेत का? तर ते पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. (Hawa) गेले १० वर्ष मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या कार्यक्रम घराघरांत गाजलेला आहे. आता पुन्हा येत असल्याने प्रेक्षक आनंदी असल्याचं दिसत. पुन्हा एकदा आपल्या भेटीला येणार आहे.
मध्यंतरी या कार्यक्रमामध्ये सारखेपणा आल्यामुळे वाहिनीने आपल्या लाडक्या कार्यक्रमाला आराम देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता पुन्हा एकदा चला हवा येऊ द्या नवी रंगात, नव्या ढंगात आपल्या भेटीला येणार आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये नवे चेहरे असणार का? त्याचं स्वरूप बदलणार का? त्यातले कलाकार कोण असतील ? हे सगळे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेतच मात्र, या पर्वाचे सूत्रसंचालन कोण करणार हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा ठरणार आहे.
Ankur Wadhave: ‘चला हवा येऊ द्या मधील अंकुर वाढवे लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार
यामागचे कारण म्हणजे चला हवा येऊ द्या कार्यक्रम बंद झाल्यानंतर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारा अभिनेता, या कार्यक्रमाचा सर्वेसर्वा डॉ. निलेश साबळे याने कलर्स मराठी वाहिनी सोबत हसताय ना हसलचं पाहिजे हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी घेऊन आला. मध्यंतरीच्या काळात झी मराठी वाहिनी आणि निलेश साबळे यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाल्याचीही बातमी होती. त्यामुळं आता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेता अभिजित खांडकेकर करणार असल्याचं समोर येत आहे.
अभिजीतने अनेक कथाबाह्य कार्यक्रम, पुरस्कार सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन केलं असून, माझिया प्रियाला प्रीत कळेना या गाजलेल्या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या घरा घरात पोहचला आणि आता हाच अभिनेता चला हवा येऊ द्या कार्यक्रमाचा नवा सूत्रसंचालन करणार असल्याची माहिती आहे. सध्या या कार्यक्रमासाठी ऑडिशनसुद्धा सुरू झाले आहेत. त्यामुळे नवोदित कलाकारसुद्धा पाहायला मिळतीय यात शंका नाही. मात्र, झी वाहिनीकडून कोण सूत्रसंचालन करणार हे काही सांगण्यात आलेलं नाही.