Chatrapathi Trailer : ‘औरों के लिए जीता…’ जनतेला चेतवणारा, भावनांना पेटवणारा; बहुचर्चित ‘छत्रपती’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 03T104239.287

Prabhas SS Rajamouli Chatrapathi Trailer: दाक्षिणात्य कलाकारांना आता बॉलिवूडची चांगलीच भूरळ पडत आहे. गेल्या काही दिवसामध्ये अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी हिंदी चित्रपटामध्ये पाऊल ठेवले आहे. आता तेलुगू अभिनेता बेलमकोंडा श्रीनिवास (Bellamkonda Sreenivas) ‘छत्रपती’ (Chatrapathi) या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. नुकताच या चित्रपट ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)


‘छत्रपती’ हा चित्रपट २००५ साली चाहत्यांच्या भेटीला आला होता. तेलुगू भाषेमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट एस.एस राजामौलींनी प्रदर्शित केला होता. या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि श्रिया सरन हे चाहत्यांना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट त्यावेळेस चित्रपट बॉक्सवर जोरदार गाजला होता. आता या चित्रपटाचा हिंदी रिमेक चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)


‘छत्रपती’ चित्रपटच्या ट्रेलरमध्ये अॅक्शन, थरार, नाट्य आणि रोमान्स बघायला मिळणार आहे. या चित्रपटातील डायलॉग चाहत्यांच लक्ष वेधून घेणारे आहेत. “अपने लिए तो हर कोई जीता है, लेकिन जो औरों के लिए जीता है उसे ‘छत्रपती’ कहते है”, असे डायलॉग या चित्रपटात आहेत. कमी वेळात या ट्रेलरला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. बेलमकोंडा श्रीनिवासचा अॅक्शनमोड ट्रेलरमध्ये बघायला मिळत आहे.

बेलमकोंडा श्रीनिवास आणि नुसरत भरुचा या चित्रपटात मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. तर शरद केळकर, भाग्यश्री, साहिल वैद्य, अमित नायर, राजेंद्र गुप्ता, शिवम पाटील, आशिष सिंह हे कलाकार देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेमध्ये चाहत्यांना दिसणार आहे. वी.वी विनायकने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर जयंतीलाल गडा यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

‘द केरळ स्टोरी’ चित्रपटावर बंदी घालू शकत नाही, कोर्टाने याचिका फेटाळली

‘छत्रपती’ हा दाक्षिणात्य चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जोरदार चांगलाच गल्ला जमवला आहे. यामुळे ‘छत्रपती’च्या रिमेकची घोषणा झाल्यावर हा चित्रपट जोरदार चर्चेत आहे. १२ मे २०२३ रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

Tags

follow us