अमेरिकेतील स्थलांतरावर भाष्य ‘Undocumented.PDF’: वास्तवाला भिडणारा नाफा फिल्म्सचा नवा लघुपट!
Undocumented.PDF हा मराठी लघुपट अमेरिकेतील स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी संस्था यांच्या अलीकडील कारवायांवर आधारित आहे.
Commentary on US immigration Undocumented.PDF A new short film by Nafa Films that confronts reality :
अमेरिकेत सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या यू.एस. इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) अर्थात अमेरिकेतील स्थलांतर आणि सीमाशुल्क अंमलबजावणी संस्था यांच्या अलीकडील कारवायांच्या पार्श्वभूमीवर “Undocumented.PDF” हा मराठी लघुपट इंग्लिश सबटायटल्स समवेत तयार करण्यात आला आहे. NAFA Films च्या बॅनरखाली या लघुपटाची निर्मिती करण्यात आली असून, कॅलिफोर्नियातील सॅन होजे येथे NAFA Film Festival 2026 मध्ये त्याचा येत्या ९ ऑगस्ट रोजी दुपारी ३:०० वाजता, प्रीमियर होणार आहे.
‘आपले, संदिग्ध, विरोधी’ मतदारांची वर्गवारी? SIR मोहिमेवर रोहित पवारांचा सर्वात मोठा दावा
या लघुपटाची कथा कॅलिफोर्नियास्थित लेखिका अमृता हार्डीकर यांनी लिहिली असून, ह्यूस्टनस्थित हर्ष महाडेश्वर यांनी दिग्दर्शन केले आहे. अमेरिकेचे काँग्रेसमन श्री ठाणेदार आणि NAFAचे संस्थापक अध्यक्ष अभी घोलप यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेचे नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीची जबाबदारी नाफाच्या वतीने नाफाचे कार्यकारी समिती सदस्य भालचंद्र कुलकर्णी यांनी पार पाडली तर कॅलिफोर्नियातील अमोल थिटे आणि गोविंद उंकळकर हे या लघुपटाचे सहनिर्माते आहेत.
अमेरिकेतील स्थलांतर धोरणांबाबत सुरू असलेल्या चर्चेमध्ये एकीकडे कठोर ICE कारवाईमुळे स्थलांतर कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, बेकायदेशीर वास्तव्यास आळा आणि सार्वजनिक सुरक्षेला बळ मिळत असल्याचा दावा केला जातो. तर दुसरीकडे अशा कारवाईमुळे स्थलांतरित समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेक कुटुंबे विभक्त झाली आहेत. तसेच, प्रलंबित इमिग्रेशन प्रक्रिया असलेल्या किंवा अनेक वर्षांपासून अमेरिकेशी घट्ट नाते असलेल्या व्यक्तींनाही त्याचा फटका बसल्याची टीका केली जात आहे.
Pune Rain Alert : पुणे, नागपूरसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस, यलो अलर्ट जारी
यावेळी नाफा संस्थापक – अध्यक्ष तथा चित्रपटाचे निर्माते अभिजित (अभी) घोलप म्हणाले, “‘Undocumented.PDF’ हा केवळ स्थलांतराच्या प्रश्नावर आधारित चित्रपट नाही, तर ती प्रत्येक माणसाच्या अस्तित्वाची, ओळखीची आणि आशेच्या संघर्षाची कथा आहे. आज जगभरात स्थलांतर हा केवळ राजकीय किंवा कायदेशीर विषय राहिलेला नसून तो लाखो कुटुंबांच्या भावविश्वाशी जोडलेला मानवी प्रश्न बनला आहे.
4 August Horoscope : आज ‘विष योग’ तयार होणार ‘या’ 5 राशींना होणार फायदा
या प्रश्नामागील मानवी वेदना, नातेसंबंध, स्वप्ने आणि वास्तव प्रेक्षकांसमोर संवेदनशीलपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नाफा फिल्म्सचे ध्येय केवळ मनोरंजन करणारे चित्रपट निर्माण करणे नाही, तर समाजाला विचार करायला लावणाऱ्या कथा सांगणे हे आहे. ‘Undocumented.PDF’ हा त्याच प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा असून, जगभरातील प्रेक्षक या चित्रपटाशी भावनिक नाते जोडतील, असा मला विश्वास आहे.”
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीची रक्कम लवकरच बँक खात्यावर जमा होणार
आजच्या जागतिक स्थलांतराच्या प्रश्नावर भाष्य करणारा आणि मानवी मूल्यांचा वेध घेणारा “Undocumented.PDF” हा लघुपट सर्वाधिक चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय ठरला असून, NAFA Film Festival 2026 मध्ये येत्या ९ ऑगस्ट रोजी दुपारी ३:०० वाजता, कॅलिफोर्निया मुख्य सभागृहात हा प्रीमियर होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.