माधुरी दीक्षित, अभिषेक ओळखपत्र वापरुन लाखोंची फसवणूक, बनावट क्रेडिट कार्ड काढून खरेदी

माधुरी दीक्षित, अभिषेक ओळखपत्र वापरुन लाखोंची फसवणूक, बनावट क्रेडिट कार्ड काढून खरेदी

मुंबई : सायबर गुन्ह्यांमध्ये (Cyber Crime) दिवसेंदिवस वाढ होत आहे. सायबर गुन्ह्यांसाठी गुन्हेगार दिवसेंदिवस नवीन प्रकाराचा अवलंब करत आहेत. आता गुन्हेगांरी चक्क बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटूंची ओळखपत्र वापरुन क्रेडिट कार्ड (Credit Card) बनवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली. (Credit Card Fraud) याप्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली.

एका टोळीने अनेक बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटूंच्या जीएसटी क्रमांकांवरुन पॅन कार्डचा डेटा चोरला आणि पुण्यातील फिनटेक स्टार्टअप ‘वन कार्ड’कडून त्यांच्या नावाने जारी केलेली क्रेडिट कार्ड मिळवली आणि यावरुन खरेदी करत लाखो रुपयांची फसवणूक केली. बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटू यांचे जीएसटी क्रमांक ऑनलाईन उपलब्ध आहेत, अशी माहिती हॅकर्सना मिळाली होती. त्याच्या आधारे हॅकर्सनी बॉलिवूड अभिनेते आणि क्रिकेटपटू यांचे PAN डिटेल्स काढले आणि त्याद्वारे त्यांच्या नावाने बनावट क्रेडिट कार्ड जारी करत फसवणूक केली.

क्रेडिट कार्ड कंपनीकडून पोलिसांत तक्रार

पुण्यातील फिनटेक स्टार्टअप कंपनीने या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल केली. एफपीएल टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून ‘वन कार्ड’ क्रेडिट कार्ड जारी केलं जातं. तसेच ऑनलाईन सेवाही पुरवल्या जातात. या क्रेडिट कार्डचा वापर ग्राहक ऑनलाईन खरेदी- विक्रीसाठी करु शकतात.

सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंच्या ओळखपत्रांचा गैरवापर

कंपनीने आरोप केला आहे की, “या फसवणूक करणाऱ्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंच्या नावावर जारी केलेले क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी पॅन आणि आधार क्रमांक ही माहिती अपलोड करुन अॅपद्वारे कंपनीशी संपर्क साधला होता.

Budget Session: ‘त्या’ बॅनरवरुन मुख्यमंत्र्यांचे राष्ट्रवादीला चिमटे, ‘एकदा ते ठरवा’

‘या’ बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंच्या नावाने फसवणूक

दिल्लीतील शाहदरा पोलीस उपायुक्त रोहित मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सायबर गुन्हेगारांनी अभिषेक बच्चन, शिल्पा शेट्टी, माधुरी दीक्षित, इमरान हाशमी आणि महेंद्र सिंग धोनी यांचं नाव आणि पॅन कार्ड वापरु क्रेडिट कार्ड बनवली. बनावट क्रेडिट कार्ड वापरनू आरोपींनी 21.32 लाख रुपयांची खरेदी केली. क्रेडिट कार्ड कंपनीला फसवणूक झाल्याचे नंतर कळले. यानंतर कंपनीने तात्काळ दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली, त्यांनी कारवाई करत याप्रकरणी पाच जणांना अटक केली.

५ आरोपी अटकेत

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुनीत, मोहम्मद आसिफ, सुनील कुमार, पंकज मिश्रा आणि विश्व भास्कर शर्मा अशी ५ आरोपींची ओळख पटली आहे. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube