पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावाची तारीख जाहीर

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सावाची तारीख जाहीर

पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. पण आज चित्रपट महोत्सव २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला असल्याची घोषणा फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी केली.

यावर्षी ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’ला महाराष्ट्र शासनाकडून आर्थिक मदत केली जाणार आहे. या महोत्सवात 72 देशांतील 1574 एन्ट्री आल्या होत्या. त्यातील 140 सिनेमे दाखवण्यात येणार आहेत. महोत्सवात दाखवण्यात येणारे सर्व सिनेमे A+ ग्रेडचे आहेत, अशी माहिती पटेल यांनी दिली.

सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर आयकॉन, कॅम्प परिसरातील आयनॉक्स आणि लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय फिल्म संग्रहायल अशा तीन ठिकाणी एकूण नऊ पडद्यांवर सिनेमांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. यंदाच्या महोत्सवात एक भारतीय आणि दोन इतर देशांतील मंडळी ज्युरीमध्ये असतील.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया 5 जानेवारी तर स्पॉट नोंदणी 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे. सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांसाठी सिनेमागृहात सिनेमा पाहण्यासाठी संपूर्ण महोत्सवासाठीचे नोंदणी शुल्क रुपये 800 असून ज्येष्ठ नागरिक, चित्रपट क्लब सदस्य आणि विद्यार्थी यांच्यासाठी 600 रुपये असणार आहे.

21 व्या पिफसाठी स्प्रधा विभागात निवड झालेले सिनेमे पुढीलप्रमाणे :
-क्लॉन्डाईक
– परफेक्ट नंबर
– थ्री थाऊजंड नंबर्ड पिसेस
– द ब्लू काफ्तान
– मेडीटेरियन फिव्हर
– एविकष्ण
– मिन्सक
– वर्ड
– बटरफ्लाय व्हिजन
– तोरी अॅन्ड लोकिता
– अवर ब्रदर्स
– व्हाईट डॉग
– बॉय फ्रॉम हेवन
– हदिनेलेंतू

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube