Viral Video: …अन् ‘बहरला हा मधुमास’ मराठीत बोलू लागली, देवोलिना भट्टाचार्जीचा मराठमोळा अंदाज चर्चेत

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 28T110436.125

Devoleena Bhattacharjee: ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) हा सिनेमा आज(२८ एप्रिल) सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. शाहीर साबळे यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि कारकीर्दीचे अनेक पैलू या सिनेमातून (cinema) मोठ्या पडद्यावर उलगडण्यात आले आहेत. बहुचर्चित असलेल्या या सिनेमाच्या टीझरपासूनच चाहत्यांना मोठी प्रतीक्षा होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)


टीझर आणि ट्रेलरप्रमाणे या सिनेमातील गाण्यांनाही चाहत्यांनी आणि कलाकारांनी विशेष पसंती दिली आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमातील ‘बहरला हा मधुमास’ हे (baharla ha madhumaas) गाणं मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे. हे गाणं सध्या रीलवर मोठ्या प्रमाणावर ट्रेंडिग आहे. चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटीही या गाण्यावर रील्स बनवत असलयाचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Devoleena Bhattacharjee (@devoleena)


गेल्या काही दिवसांपूर्वी किली पॉल आणि अमेरिकन सोशल मीडिया स्टार रिकी पाँड यांनी देखील या गाण्यावर रील्स बनवले आहेत. आता प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) म्हणजेच गोपी बहूने देखील ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची भुरळ पडली आहे. गोपी बहूने ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर रील बनवला आहे.

या व्हिडीओत तिने खास लाल रंगाची नऊवारी साडी नेसली आहे. हातात हिरव्या बांगड्या आणि पारंपरिक दागिन्यांचा साज करत मराठमोळा लूक केला आहे. ‘बहरला हा मधुमास’ गाण्याची हुक स्टेप केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. गोपी बहूचा हा व्हिडीओ चर्चेत असून त्यावर चाहत्यांनी देखील मोठ्या प्रमाणात कमेंटही केल्या आहेत.

Filmfare Award 2023 : अलियाच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ने मारली बाजी, जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी…

‘महाराष्ट्र शाहीर’ सिनेमात अभिनेता अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमात तो शाहीर साबळे यांच्या भूमिकेमध्ये चाहत्यांना दिसणार आहे. केदार शिंदेंची लेक सना शिंदे या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या सिनेमात तिने भानुमती साबळे यांची भूमिका साकारली असलयाचे दिसून आली आहे.

Tags

follow us