Dharmaveer: ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ ठरला महाराष्ट्राचा फेव्हरेट सिनेमा

Dharmaveer: ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ ठरला महाराष्ट्राचा फेव्हरेट सिनेमा

मुंबई : झी स्टुडिओच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ ह्या बहुचर्चित पुरस्कार सोहळ्यात ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer Mukkam Post Thane) या सिनेमाने बाजी मारलीय.

झी स्टुडिओचा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ हा बहुचर्चित पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात ‘धर्मवीर’ सिनेमाने बाजी मारलीय.

धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आयुष्यावर आधारित असलेल्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील एक खास पोस्ट शेअर करत सिनेमाच्या टीमचं अभिनंदन केलंय.

एकनाथ शिंदे यांनी खास पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,”महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ या पुरस्कार सोहळ्यात ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमाने विविध विभागातील पुरस्कार पटकावले आहेत. सर्व पुरस्कार विजेते कलाकार, तंत्रज्ञ तसेच निर्माते मंगेश देसाई यांचे मनापासून अभिनंदन… हार्दिक शुभेच्छा”.

‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या पुरस्कार सोहळ्यात ‘धर्मवीर’ हा सिनेमा महाराष्ट्राचा फेव्हेरेट ठरला आहे. ‘धर्मवीर’ महाराष्ट्राचा फेव्हेरेट ठरण्यासोबत या सिनेमाला आणखी चार पुरस्कारदेखील मिळाले आहेत.

फेवरेट अभिनेता प्रसाद ओक ठरला आहे. तर फेवरेट दिग्दर्शक प्रवीण तरडे ठरले आहेत. महाराष्ट्राचा फेवरेट गायक आदर्श शिंदे ठरला आहे. तर फेवरेट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार स्नेहल तरडेला मिळाला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube