‘धुरंधर: द रिव्हेंज’-आदित्य धर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसचा बादशाह ठरतोय का ?
Dhurandhar: The Revenge Movie- हा चित्रपट—अपेक्षांना न्याय देतो का? पुन्हा 1000 कोटींचं स्वप्न साकार करू शकतो का?
Dhurandhar: The Revenge Movie Review: आदित्य धर… हे नाव आता केवळ दिग्दर्शक म्हणून नाही, तर भव्य आणि प्रभावी सिनेमॅटिक अनुभवांची हमी म्हणून ओळखलं जातं. ‘Uri: The Surgical Strike’ ने त्यांनी आपली ताकद सिद्ध केलीच होती; पण ‘धुरंधर’ फ्रँचायझीने त्यांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं.
पहिल्या भागाने तर अक्षरशः इतिहास घडवला—एकाच भाषेत रिलीज होऊन, मध्य-पूर्वेत थिएटर रिलीज नसतानाही 1000 कोटींचा टप्पा पार करणं… हे केवळ यश नाही, तर सांस्कृतिक लाट (cultural phenomenon) होती. आणि आता… अवघ्या तीन महिन्यांत ‘Dhurandhar: The Revenge’ घेऊन आदित्य धर आणि रणवीर सिंग पुन्हा प्रेक्षकांसमोर!
हिंदीसह दक्षिण भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट—अपेक्षांना न्याय देतो का? पुन्हा 1000 कोटींचं स्वप्न साकार करू शकतो का?
आणि सर्वात महत्त्वाचं… रणवीर सिंग जादू करू शकतो का? चला, सविस्तर पाहूया
कथा : सूड, गुप्तहेरगिरी आणि सत्तेच्या खेळाची थरारक गोष्ट
‘The Revenge’ची कथा पहिल्या भागाच्या शेवटापासूनच पुढे सरकते. जसकिरत सिंग रंगी उर्फ हमजा अली मझारी… ल्यारीच्या बलोच गँगमध्ये घुसखोरी करून स्वतःचं साम्राज्य उभं करणारा हा गुप्तहेर…या भागात त्याच्या प्रवासाची खोल बाजू उलगडते…
तो गँगचा म्होरक्या कसा बनतो?
रहमान डकैतच्या मृत्यूनंतर सत्तासंघर्ष कसा पेटतो? यालिना त्याचा मुखवटा फाडते का? आणि मेजर इक्बालसमोर त्याचं खरं रूप आल्यानंतर खेळ कोणत्या दिशेने वळतो ? इतकंच नाही… भारतातील 2016 च्या नोटाबंदीशी जोडलेलं त्याचं मिशन कथेला रिअल-लाइफ पॉलिटिकल थरार देतं.
अभिनय : रणवीर सिंगचा ‘करिअर-डिफाइनिंग’ परफॉर्मन्स
रणवीर सिंगने जसकिरत/हमजा या भूमिकेत अक्षरशः जीव ओतला आहे. एक गुप्तहेर, एक मुलगा, एक पती—तीन वेगवेगळ्या भावविश्वांमध्ये तो सहज फिरतो. हा अभिनय फक्त प्रभावी नाही… तर पुरस्कारावर नाव करणारा आहे.
आर. माधवन (अजय संन्याल) – मर्यादित स्क्रीन टाइम, पण प्रचंड प्रभाव
अर्जुन रामपाल आणि संजय दत्त –अस्तित्व अधोरेखित करणारा… दमदार
राकेश बेदी –विनोदाचा परफेक्ट टच… बेरकी… मुत्सद्देगिरीचा कळस
सारा अर्जुन –थोडक्यात पण कुतूहल जागवणारा चेहरा
विशेष म्हणजे—या चित्रपटात एकही कलाकार “कमकुवत” वाटत नाही. प्रत्येक व्यक्तिरेखा लक्षात राहते.
तांत्रिक बाजू: भारतीय सिनेमासाठी नवा बेंचमार्क
‘धुरंधर’ म्हणजे केवळ कथा नाही…तो एक टेक्निकल मास्टरक्लास आहे.
शाश्वत सचदेवचं पार्श्वसंगीत – प्रत्येक सीन उंचावणारं
विकाश नवलखा यांची सिनेमॅटोग्राफी – नेत्रदीपक
ॲक्शन कोरिओग्राफी – रॉ, रिअल आणि थरारक
प्रॉडक्शन डिझाईन – सेट्स इतके वास्तववादी की खरेच वाटतात
थोडक्यात -हा चित्रपट हॉलिवूडला टक्कर देणारा भारतीय अनुभव देतो.
तुम्ही या चित्रपटाच्या राजकीय भूमिकेशी सहमत असाल किंवा नाही…पण एक गोष्ट निश्चित आहे. आदित्य धरने ‘धुरंधर’ला ज्या भव्यतेने आणि परिपूर्णतेने साकारलं आहे, ते भारतीय सिनेमासाठी एक मापदंड ठरतं.‘Dhurandhar: The Revenge’ हा केवळ सीक्वेल नाही…
तो एक सिनेमॅटिक अनुभव, एक भावनिक प्रवास, आणि एक बॉक्स ऑफिस वरचं वादळ आहे.
अमित भंडारी, चित्रपट समीक्षक
का पाहावा ?
उत्कंठावर्धक नाट्य
रणवीर सिंगचा अफलातून अभिनय
तांत्रिकदृष्ट्या उत्कृष्ट,
दमदार क्लायमॅक्स ट्विस्ट
ॲक्शन आणि बॅकग्राउंड स्कोर
का टाळावा ?
अतिरंजित रक्तपात
पटकथेतील काही “सोयीस्कर” वळणं
वेळेचे गणित मात्र गडबडलंय
थोडक्यात काय ?
Must Watch for Big Screen Experience!
मी या चित्रपटाला चार स्टार्स देतो