दिशा सालियनवर अत्याचार? मृ्त्यूचं कारण झालं स्पष्ट, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर

Disha Salian Death Postmortem Report Head Injury : मागील काही दिवसांपासू दिशा सालियन (Disha Salian Death) प्रकरण चांगलंच चर्चेत आहे. नुकताच दिशाच्या वडिलांनी अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली, असा खळबळजनक दावा केला होता. त्यानंतर आता या प्रकरणात महत्वाची माहिती समोर आलीय. दिशाचा मृ्त्यू नेमका कशामळे झाला? तिच्यावर अत्याचार झाला होता (Disha Salian News) का? यासंदर्भात दिशा सालियनचा शवविच्छेदनचा अहवाल समोर आलाय.
शवविच्छेदन अहवालात समोर आलंय की, दिशाच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. तसंच तिच्या हात, पाय आणि छातीला देखील जखमा झालेल्या होत्या. तर डोक्याची जखम गंभीर स्वरूपाची होती. ही जखम खूप खोलवर होती.त्यामळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता, हीच जखम दिशाच्या मृत्यूला कारणीभूत ठरली, असं दिशाच्या पोस्टमार्टम अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे.सोबतच दिशावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार, बलात्कार झाला नव्हता, असं देखील स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळं आता पुन्हा या प्रकरणात ट्विस्ट आलाय.
मोठी बातमी! देशभरात UPI सेवा ठप्प, गुगल पे, फोन पे बंद; युजर्सचा संताप, घडलं काय?
दिशा सालियनचा 8 जून 2020 रोजी मृ्त्यू झाला होता. मुंबईतील मालाड येथील इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला. त्यावेळी पोलिसांनी या घटनेला आत्महत्या म्हटलं होतं. काही दिवसांनी, 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंग राजपूत त्याच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळला होता. दोन्ही घटनांबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, परंतु 2022 मध्ये सीबीआयने आपल्या तपासात दिशाच्या मृत्यूला अपघात म्हटलं होतं. रिपोर्टमध्ये म्हटलंय की, दिशाने पार्टीत दारू प्यायली होती, त्यानंतर ती पडली आणि तिचा मृत्यू झाला. त्यावेळी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी पोलीस तपासावर विश्वास व्यक्त केला होता. परंतु, आता पाच वर्षांनंतर ते नव्याने तपासाची मागणी करत आहेत.
मोठी बातमी! देशभरात UPI सेवा ठप्प, गुगल पे, फोन पे बंद; युजर्सचा संताप, घडलं काय?
सतीश सालियन यांनी सोमवारी मुंबई पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार सादर केली. यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे आणि त्यांची मुलगी दिशा सालियन हिच्या कथित सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी काही जणांविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. त्यांचे वकील नीलेश ओझा म्हणाले की, ही तक्रार सहपोलीस आयुक्तांनी स्वीकारली आहे. तक्रारीत आदित्य ठाकरे, माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग, पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि अभिनेता सूरज पांचोली यांची नावे आरोपी म्हणून आहेत.